मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

चंद्रपूर: वाघाच्या हल्ल्यात दोन ग्रामस्थांचा मृत्यू, गावात भीतीचे वातावरण

चंद्रपूर: वाघाच्या हल्ल्यात दोन ग्रामस्थांचा मृत्यू, गावात भीतीचे वातावरण

Chandrapur: चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात दोन ग्रामस्थांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

Chandrapur: चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात दोन ग्रामस्थांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

Chandrapur: चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात दोन ग्रामस्थांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

  • Published by:  Sunil Desale

हैदर शेख, प्रतिनिधी

चंद्रपूर, 11 मे: चंद्रपूर जिल्ह्यात (Chandrapur District) वाघाच्या हल्यात आज दोन ग्रामस्थांचा मृत्यू (2 villagers died in tiger attack) झाला आहे. दोन ग्रामस्थांचा मृत्यू झाल्याने गावात तणावाचे वातावरण आहे. शेतात काम करत असलेल्या 35 वर्षीय किर्तीराम देवराव कुलमेथे (Kirtiram Devrao Kulmethe) या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील जानाळा शेतशिवारात ही घटना घडली आहे.

मिळालेल्या प्रथमिक माहितीनुसार, मूल तालुक्यातील जानाळा शेतशिवारात किर्तीराम देवराव कुलमेथे हे काम करत होते दुपारच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला. वाघाने त्यांच्यावर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यांच्या शेताला लागूनच ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा जंगल परिसर आहे. वाघाच्या हल्ल्यात ग्रामस्थाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी सुद्धा दाखल झाले होते.

VIDEO: आपल्या साथीदारांना वाचवण्यासाठी थेट सिंहाशी भिडली म्हैस; पुढे असं काही झालं...

दुसऱ्या एका घटनेत वाघाच्या हल्लयात 53 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. 53 वर्षीय वनिता गेडाम (Vanita Gedam) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. मूल तालुक्यातील जानाळा गावातील ही महिला तेंदूपत्ता तोडण्याचे काम करते आणि हे काम करत असतानाच तिच्यावर वाघाने हल्ला केला होता.

वनिता गेडाम या मूल तालुक्यातील जानाळा गावातील जंगलात तेंदूपत्ता तोडण्याचं काम करतात. 4 मे रोजी त्या आपले तेंदूपत्ता तोडण्याचं काम करत असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. वाघाच्या हल्ल्यात वनिता गेडाम या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी चंद्रपूर सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज वनिता यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आजच गावातील किर्तीराम यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

First published:

Tags: Chandrapur, Tiger attack