Home /News /maharashtra /

दोन ट्रकचा भीषण अपघात, केबिन चक्काचूर झाली आणि...

दोन ट्रकचा भीषण अपघात, केबिन चक्काचूर झाली आणि...

ही धडक इतकी भीषण होती की, उभा असलेला ट्रक थेट डिव्हायडरवर चढला.

शिर्डी, 13 जून : अहमदनगर- मनमाड महामार्गावर राहाता शहराजवळ दोन मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रक ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला आहे. तर क्लिनर जखमी झाला आहे. आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास राहाता शहराजवळ मनमाड महामार्गावर हा अपघात झाला. राहता महामार्गावर रस्त्याच्या बाजूला एक ट्रक बंद अवस्थेत उभा होता. त्याच वेळी या महामार्गावर राजस्थानकडे निघालेल्या भरधाव ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की,  उभा असलेला ट्रक थेट डिव्हायडरवर चढला. ट्रकचा भरधाव वेगात होता, त्यामुळे उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्यानंतर काही अंतर दूरपर्यंत घेऊन गेला. हेही वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या ड्रीम प्रोजेक्टमध्ये भ्रष्टाचाराचा संशय धडक देणाऱ्या  ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला. या भीषण अपघातात राजस्थान येथील रहिवासी असलेल्या ट्रक ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला. तर क्लिनर जखमी झाला आहे. जखमी क्लिनरला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कार आणि ट्रकची धडक, 1 ठार दरम्यान, गडचिरोलीमध्ये ट्रक आणि कारची धडक होऊन  भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघातात इतका भयंकर होता की कारचा चक्काचूर झाला आहे. अहेरीवरुन चंदारपुरला उपचारासाठी जाणाऱ्या कारला लगाम गावाजवळ ट्रकने धडक दिली. यामुळे झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर गंभीर जखमी अवस्थेत दोघांना अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हेही वाचा -मुंबईत मोठी कारवाई, कॉलेज तरुणांना ऑनलाइन गांजा विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश अपघात झाल्यानंतर कारमध्ये अडकून पडलेल्या व्यक्तीला बाहेर काढताना मोठी कसरत करावी लागली. कारण, ट्रकच्या धडकेमुळे कारच्या पुढच्या बाजूचं मोठं नुकसान झालं होतं. दुर्घटना घडल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

Tags: Truck accident, अहमदनगर

पुढील बातम्या