मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मुंबई-गोवा महामार्गावर अग्नितांडव, अपघातानंतर 2 ट्रकचा उरला सांगाडा

मुंबई-गोवा महामार्गावर अग्नितांडव, अपघातानंतर 2 ट्रकचा उरला सांगाडा

घटनास्थळाचा फोटो

घटनास्थळाचा फोटो

गेल्या तीन तासांपासून मुंबई-गोवा महामार्ग ठप्प होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Ratnagiri, India

रत्नागिरी, 19 डिसेंबर : मुंबई-गोवा महामार्गावर अग्नितांडव पाहायला मिळाले. अपघातानंतर दोन ट्रकचा फक्त सांगाला उरला होता. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे. हातकंबा येथे झालेल्या दोन ट्रकमधील भीषण अपघात झाला. या अपघातानंतर लागलेल्या आगीत दोन्ही ट्रक आगीच्या भक्षस्थानी पडल्या. अग्निशमक दलांच्या तीन गाड्या मिळून आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. गेल्या अडीच तासांपासून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते.

दरम्यान, गेल्या तीन तासांपासून मुंबई-गोवा महामार्ग ठप्प होता. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रशासनाला तीन तासानंतर यश आले आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रशासनाने शर्तीचे प्रयत्न केले. अखेर या प्रयत्नांनंतर आग विझविण्यात अखेर यश आले आहे.

हेही वाचा - अधिवेशनादरम्यान झालं आमदार आईचं दर्शन, राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे VIDEO

जळगावातही दोन घरांना आग, मोठं नुकसान

जळगाव शहरातील जुने जळगाव भागात असलेल्या आंबेडकर नगरात दोन घरांना अचानक आग लागली. या आगीत संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. आगीच्या घटनेची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिकेचे दोन अग्निशमन बंबाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यात आले आहे.

जळगाव शहरातील जुने जळगाव भागात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात सुमारास सुमारास एका पार्टेशनच्या घरामध्ये अचानक आग लागली. दरम्यान ही आग कशामुळे लागली ही माहिती अद्यापसमोर आलेली नाही. दरम्यान या आगीमुळे शेजारी असलेले पार्टिशनचे घरानेदेखील पेट घेतला. यामध्ये दोघी कुटुंबातील घरातील संसारोपयोगी वस्तूंसह महत्वाची कागदपत्रे, आदी सामान जाळून खाक झाले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव महानगरपालिकेचे दोन अग्निशमन बंब घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यात आली आहे. यामध्ये दोन्ही कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे.

First published:

Tags: Accident, Truck accident