काळ आला होता पण... दरीत कोसळलेले ट्रेकर्स वाचले

काळ आला होता पण... दरीत कोसळलेले ट्रेकर्स वाचले

पेब किल्ल्याजवळच्या दरीत दोघं जण कोसळले. सुदैवानं दोघांनाही वाचवण्यात ट्रेकर्स तसंच प्रशासनाला यश आलंय.

  • Share this:

संतोष दळवी, 10 जुलै : नागपूरच्या बातमीनं महाराष्ट्राला हादरवल्यानंतर माथेरानहूनही असंच वृत्त आहे.  पेब किल्ल्याजवळच्या दरीत दोघं जण कोसळले. सुदैवानं दोघांनाही वाचवण्यात ट्रेकर्स तसंच प्रशासनाला यश आलंय.

हर हर महादेवच्या घोषणा देत कधी काळी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या दऱ्याखोऱ्यांमध्ये मावळ्यांना लढायला सज्ज केलं त्याच दऱ्यांमध्ये आता ह्या घोषणा होतायत ते दरीत कोसळलेल्या दोन ट्रॅकर्सना बाहेर काढताना. कारण रिया शहा आणि हर्षल व्होरा हे एक नाही दोन नाही तर रविवारी दुपारी अडीचशे फुट दरीत कोसळले. ही घटना घडली ते विकटगड म्हणजे पेब किल्ला उतरताना. दुपारी माथेरानच्या बाजूनं पेब किल्ला उतरताना रियाचा पाय घसरला आणि ती दरीत कोसळायला लागली. त्याच वेळेस हर्षलनं तिला हात देऊन पकडण्याचा प्रयत्न केला तर तोही तिच्यासोबत अडीचशे फुट खाली गेला.

दरीत कोसळलेल्या हर्षल आणि रियाला काढण्यासाठी खोपोलीचे ट्रेकर्स दरीत उतरले. त्याला हळहळू संध्याकाळ झाली. सुदैवानं एवढ्या उंचीवरून पडूनही हर्षल आणि रिया दोघांचाही जीव वाचला होता. त्यांचे  हात पाय मात्र फ्रॅक्चर झालेत.

दरीतून वर काढतानाही स्थानिक आणि प्रशासनाला तेवढीच मेहनत घ्यावी लागली आणि चढण सोपी नव्हती. दोर बांधत, हर हर महादेवच्या घोषणा देत बाहेर काढलं आणि नंतर रूग्णवाहिकेनं दोघांनाही हॉस्पिटलला दाखल केलं. डोली तयार करून दोघांनाही हायकर्सनी जवळपास तीन किलोमीटरची चढण पार केली.

कल्याणचा खजिना लुटून छत्रपतींनी पेब किल्ल्यावरच तो सुरक्षित ठेवला होता. तोच किल्ला आता मुंबईकरांसाठी ट्रेकिंगचं आकर्षण ठरलाय. तो फणसवाडीच्या बाजूनं चढला तर अवघड आहे. जशी चढण अवघड आहे तशी उतरणही. त्यामुळे आपण जर इथं ट्रेकिंगला जात असाल तर पूर्ण तयारीनिशीच जा. जाणकारांचा सल्ला अवश्य लक्षात ठेवा.

First published: July 10, 2017, 4:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading