• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • National Award for Teachers: महाराष्ट्रातील 'या' दोन शिक्षकांचा राष्ट्रीय पुरस्कारनं होणार सन्मान; देशातील 44 शिक्षकांचा समावेश

National Award for Teachers: महाराष्ट्रातील 'या' दोन शिक्षकांचा राष्ट्रीय पुरस्कारनं होणार सन्मान; देशातील 44 शिक्षकांचा समावेश

महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना यंदा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 02 सप्टेंबर: अवघ्या महाराष्ट्राची मान आपल्या कर्तृत्वानं आणि परिश्रमानं उंचावणाऱ्या दोन शिक्षकांना यंदा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. यंदा देशात 5 ते 17 सप्टेंबर दरम्यान शिक्षक पर्व (Shikshak Parv in India) साजरं केलं जाणार आहे. त्या अनुषंगानं देशभरातील तब्बल 44 शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कारानं (National awards for Teachers) सन्मानित केलं जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन शिक्षकांचा (Teachers from Maharashtra got National awards for Teachers) समवेश आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे अतिरिक्त सचिव संतोष कुमार सारंगी यांनी 5 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान देशात शिक्षक पर्व साजरं केलं जाईल असं जाहीर केलं आहे.. संतोष कुमार यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे. आम्ही शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन या पर्वाची सुरुवात करू असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटलं आहे. यंदा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या शिक्षकांमध्ये महाराष्ट्र (Maharashtra), हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, दिल्ली, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, ओडिशा, पश्चिम बंगाल, जम्मू आणि काश्मीर, लडाख, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, सिक्कीम, मिझोराम, त्रिपुरा , आसाम, झारखंड, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या राज्यांमधील शिक्षकांचा समावेश आहे. हे वाचा - Maharashtra Schools Reopen: पुढील दोन दिवसांत शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेणार महाराष्ट्रातील 'या' शिक्षकांचा होणार सन्मान यंदा या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातील दोन शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची त्यांची जिद्द आणि मेहनत यामुळे त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. यात गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील अस्रल्ली गावाच्या श्री खुर्शीद कुतुबुद्दीन शेख या जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकाचा समावेश आहे. तर उस्मानाबाद जिल्ह्यातील कडोर या गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक श्री उमेश रघुनाथ खोसे यांनाही राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार सन्मान देशभरातून निवड झालेल्या या 44 शिक्षकांपैकी 5 शिक्षकांचा सन्मान शिक्षक दिनाच्या दिवशी म्हणजेच 5 सप्टेंबरला करण्यात येणार आहे. तर 7 सप्टेंबर रोजी 'शिक्षा संमेलनात' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शिक्षकांसाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्यास सुरुवात होणार आहे. यामध्ये शिक्षकांव्यतिरिक्त पालक आणि विद्यार्थी देखील सहभागी होणार आहेत.
  Published by:Atharva Mahankal
  First published: