नक्षलवादी हल्ल्यातील शहीदांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील या दोन सुपुत्रांचा समावेश

नक्षलवादी हल्ल्यातील शहीदांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील या दोन सुपुत्रांचा समावेश

नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत घडवून आणलेल्या हल्ल्यात सी-60 कमांडो पथकातील 15 जवान शहीद झाले आहेत. तसेच गाडी चालकाचाही मृत्यू झाला. जवानांचे वाहन जात असलेल्या मार्गावर नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोटके पेरुन ठेवले होती. त्यावरुन जवानांचे वाहन जाताच आयईडीचा स्फोट झाला. बहुतांश जवानांचे मृतदेह छिन्नविछिन्न झाली आहेत.

  • Share this:

गडचिरोली, 1 मे- नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत घडवून आणलेल्या हल्ल्यात सी-60 कमांडो पथकातील  15 जवान शहीद झाले आहेत. तसेच गाडी चालकाचाही मृत्यू झाला. जवानांचे वाहन जात असलेल्या मार्गावर नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोटके पेरुन ठेवले होती. त्यावरुन जवानांचे वाहन जाताच आयईडीचा स्फोट झाला. बहुतांश जवानांचे मृतदेह छिन्नविछिन्न झाली आहेत. शहीदांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील दोन जवानांचा समावेश आहे.

सर्जेराव उर्फ संदीप खर्डे ( रा. आळंद) व राजू गायकवाड अशी दोन्ही वीर जवानांची नावे आहेत.  जांभूरपाडा गावाजवळ बुधवारी दुपारी हा हल्ला झाला.

सर्जेराव खर्डे हे 2011 मध्ये गडचिरोलीत राज्य राखीव दलात भरती झाले होते. यांचे वडील एकनाथ खर्डे हे आळंद (ता. बुलडाणा) येथील सरपंच आहेत. भाऊ दीपक खर्डे याचे सोलापूरला ट्रेनिंग झाले आहे.  शहीद जवान सर्जेराव यांच्या पश्चात पत्नी स्वाती खर्डे, मुलगी (वय 2), आई कमलाबाई असा परिवार आहे.

शहीद जवान राजू गायकवाड (वय-24) हे गडचिरोली येथे 7 वर्षांपूर्वी भरती झाले होते. त्यांचे 5 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 वर्षांची मुलगी, 4 महिन्यांचा मुलगा आहे. सध्या आई-वडील गडचिरोली गेले आहेत.

VIDEO : गडचिरोलीत जिथे स्फोट घडला 'त्या' परिसरात पोहोचला न्यूज18 लोकमतचा प्रतिनिधी, संपूर्ण आढावा

First published: May 1, 2019, 9:15 PM IST

ताज्या बातम्या