मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Tauktae Cyclone effect जळगावात वादळामुळं झोपडीवर कोसळलं झाड, दोन बहिणींचा गुदमरून मृत्यू

Tauktae Cyclone effect जळगावात वादळामुळं झोपडीवर कोसळलं झाड, दोन बहिणींचा गुदमरून मृत्यू

Tauktae Cyclone effect गावाबाहेरच्या खळ्यात असलेलं चिंचेचे झाड कोसळल्यानं झोपडी त्याखाली दबली. या झोपडीत असलेल्या दोन बहिणींचा त्यात दबल्याने मृत्यू झाला आहे.

  • Published by:  News18 Desk

जळगाव, 16 मे : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) तालुक्यात अंचलवाडी (Anchalwadi) इथं वादळामुळं झाड कोसळून (tree collapse)झालेल्या अपघातात दोन बहिणींचा (two sisters died) मृत्यू झाला आहे. गावाबाहेरच्या खळ्यात असलेलं चिंचेचे झाड कोसळल्यानं झोपडी त्याखाली दबली. या झोपडीत (Hut) असलेल्या दोन बहिणींचा त्यात दबल्याने मृत्यू झाला आहे.

(वाचा-बाईकवरुन जाणाऱ्या नवविवाहित जोडप्याचं पोलिसांनी केलं स्वागत; VIDEO व्हायरल)

अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळं राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि पावसाचा तडाखा बसल्याचं पाहायला मिळालं आहे. सागरी किनारपट्टीला लागून असलेल्या मुंबई आणि कोकणात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. तर राज्यात इतर जिल्ह्यांतही यामुळं वादळी वारा आणि पाऊस पाहायला मिळाला. जळगावमध्येही रविवारी दुपारच्या सुमारास अचानक मोठा पाऊस आला. वादळी वारेही जोरात वाहत होते. त्यामुळं अनेक भागांमध्ये झाडं उन्मळून पडल्याचंही पाहायला मिळालं.

(वाचा-'राष्ट्रवादीची इच्छा नव्हती म्हणून मराठा आरक्षणाचा मुडदा पाडला'- चंद्रकांत पाटील)

जळगावच्या अमळनेरमद्ये अंचलवाडी इथंही वादळी वाऱ्याचा प्रकोप पाहायला मिळाला. याठिकाणी गावाबाहेरील खळ्यात चिंचेचं झाड कोसळलं. याठिकाणी असलेली झोपडी झाडाखाली दबली. त्यात पावरा समाजाच्या दोन बहिणींचा मृत्यू झाला आहे. रणाईचे इथं राजेंद्र पाटील यांच्या शेतात सालदार असलेल्या बल्लू बारेला याने गावाबाहेर खळ्यात झोपडी तयार केली होती. तिथं तो पाहत होता. पण रविवारी दुपारी 3 च्या सुमारास अचानक जोरात वादळ आणि पाऊस सुरू झाला. काही कळण्याच्या आत खळ्यात असलेलं चिंचेचं झाड कोसळलं. त्यात बल्लूची झोपडी दाबली गेली. त्यात त्याच्या मुली ज्योती बारेला आणि रोशनी बारेला दाबल्या गेल्या आणि त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकारानंतर ताबडतोब गावातील सरपंच आणि इतर ग्रामस्थ त्याच्या मदतीसाठी धावून आले. पण संपूर्ण घर दाबले गेले होते. तसेच झाड मोठे असल्यानं ते कापून खाली दबलेल्या मुली आणि इतर सामान काढण्याचा प्रयत्न करण्यात येत होता.

First published:

Tags: Cyclone, Jalgaon