मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ओढ्यात अंघोळ जीवावर बेतली, दोन सख्ख्या बहिणी बुडाल्या, लहान भाऊ वाचला!

ओढ्यात अंघोळ जीवावर बेतली, दोन सख्ख्या बहिणी बुडाल्या, लहान भाऊ वाचला!

लहान भाऊ मायाप्पा शिवानंद ऐवळे याला पाण्यात बुडताना ओढ्यालगत जनावरे राखणारा संभाजी माने या युवकाने पाहिले

लहान भाऊ मायाप्पा शिवानंद ऐवळे याला पाण्यात बुडताना ओढ्यालगत जनावरे राखणारा संभाजी माने या युवकाने पाहिले

लहान भाऊ मायाप्पा शिवानंद ऐवळे याला पाण्यात बुडताना ओढ्यालगत जनावरे राखणारा संभाजी माने या युवकाने पाहिले

सांगली, 12 सप्टेंबर : राज्यभरात पावसाने धुमशान (Maharashtra rain) घातले आहे. नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहे. अनेक ठिकाणी पाण्यात वाहून जाण्याच्या दुर्दैवी घटना घडत आहे.  सांगली (sangali) जिल्ह्यातील जत (jaat) तालुक्यामध्ये गावाच्या ओढ्यात अंघोळीसाठी गेलेल्या दोन्ही सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू ( two sisters drowned) झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर या दुर्घटनेत त्यांचा सहा वर्षांचा लहान भाऊ थोडक्यात बचावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  जत तालुक्यातील उमदी गावात ही घटना घडली आहे. आंघोळीसाठी गेलेल्या दोन्ही सख्ख्या बहिणीचा पाण्याचा अंदाज न आल्याने रेणुका शिवानंद ऐवळे (वय 7) आणि लक्ष्मी शिवानंद ऐवळे (वय 11) यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  तर त्याच्या सोबतच पोहायला गेलेला लहान भाऊ मायाप्पा शिवानंद ऐवळे (वय ६) हा बचावला आहे.

Bank Jobs: म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक मुंबई इथे होणार भरती; या लिंकवर करा अर्ज

ऐवळे कुटुंबीय हे काही दिवसांपासून उमदी गावात ओढ्यालगत असणाऱ्या आपल्या घरात राहत होते. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होते. आज सकाळी घरातील सर्व लोक दुसऱ्यांच्या शेतात कामासाठी गेले होते. घरात दोन मुली आणि एक मुलगा हे घरात होते. दुपारी आंघोळ करण्यासाठी दोन्ही बहिणी आणि एक भाऊ असे तिघे मिळुन ओढापात्रात आंघोळी करण्यासाठी गेले. परंतु, पाण्याचा अंदाज न आल्याने या दोन्ही सख्ख्या बहिणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

नवविवाहित महिलांनी 1 वर्षासाठी प्रेग्नंसी पुढं ढकलावी; या सरकारचा अजब-गजब निर्णय

तर त्याचवेळी त्यांच्या सोबतच पोहण्यासाठी गेलेला लहान भाऊ मायाप्पा शिवानंद ऐवळे याला पाण्यात बुडताना ओढ्यालगत जनावरे राखणारा संभाजी माने या युवकाने पाहिले आणि त्यांने तात्काळ उडी घेत त्या चिमुकल्याचे प्राण वाचवले. या घटनेने उमदी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

First published:

Tags: Sangali, सांगली