Home /News /maharashtra /

एकाच साडीनं गळफास घेत दोन बहिणींची आत्महत्या; प्रकरणात मोठा खुलासा

एकाच साडीनं गळफास घेत दोन बहिणींची आत्महत्या; प्रकरणात मोठा खुलासा

Suicide in Latur: शनिवारी लातूर शहरातील गोविंदनगर भागात एकाच साडीनं गळफास घेत दोन बहिणींनी आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. याप्रकरणात महत्त्वाचा खुलासा समोर आला आहे.

    लातूर, 05 जुलै: शनिवारी लातूर (Latur) शहरातील गोविंदनगर भागात एकाच साडीनं (Saree) गळफास घेऊन दोन मावस बहिणींनी आत्महत्या (two sisters commits suicide) केल्याची घटना समोर आली होती. हसत्या खेळत्या कुटुंबातील दोन बहिणींनी असं टोकाचं पाऊल उचलल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संबंधित बहिणींच्या आत्महत्येप्रकरणी लातूर एमआयडीसी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. दोघींना आत्महत्येच प्रवृत्त केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत. गीतांजली बनसोडे (वय-17) आणि धनश्री क्षीरसागर (वय-20) असं आत्महत्या करणाऱ्या मावस बहिणींची नावं आहेत. लातूर शहरालगत हरंगुळ रोड परिसरातील गोविंद नगरमध्ये त्या आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होत्या. शनिवारी सकाळी 10 ते 11 च्या सुमारास दोन्ही बहिणी कपडे धुवायचं कारण सांगून तळमजल्यावरून घराच्या वरच्या मजल्यावर गेल्या. वरच्या मजल्यावर असणाऱ्या खोलीत दोघींनी एकाच साडीनं गळफास लावून आयुष्याचा शेवट केला. हेही वाचा-प्रेयसीच्या प्रेमासाठी कायपण! बहाद्दरानं मित्राच्या मदतीनं पत्नीला संपवलं बराच वेळ झाला तरी मुली खाली आल्या नाहीत, म्हणून घरातील एका सदस्यानं वरच्या मजल्यावर जाऊन खोलीचा दरवाजा वाजवला. पण खोलीतून काहीही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे कुटुंबातीस सदस्यानं आत डोकावलं असता, दोन्ही बहिणींचा गळफास लावल्याच्या अवस्थेत मृतदेह आढळले. दोघींनी एकाच साडीनं गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला होता. या घटनेची माहिती होताच, कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली. आत्महत्येपूर्वी मृत बहिणींनी सुसाइड नोटही लिहिली नाही, त्यामुळे त्यांच्या आत्महत्येचं गूढ बनलं होता. याप्रकरणाचे महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. हेही वाचा-टिकटॉक स्टारची प्रेयसीला चालत्या दुचाकीवर मारहाण;इन्स्टाग्रामवर VIDEO केला अपलोड दोन्ही बहिणींना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शेजारी राहणाऱ्या पंकज सुतार नामक तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी न्यायालयानं आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. आठ दिवसांपूर्वी मृत दोन्ही मुली हरंगूळ येथील राहत्या घरातून बेपत्ता झाल्या होत्या. यानंतर पोलिसांनी त्यांना पुण्यातून ताब्यात घेऊन कुटुंबीयांच्या ताब्यात दिलं होतं. मात्र त्यांनी घरी परतल्यानंतर शनिवारी दुपारी एकाच साडीनं गळफास घेत आपलं जीवन संपवलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime, Crime news, Latur, Maharashtra, Mumbai, Shocking news, Suicide

    पुढील बातम्या