नागपूर स्टेशनवर बिहारहुन आलेल्या दोघांना अटक, 2 पिस्टलसह 20 काडतूस जप्त

नागपूर स्टेशनवर बिहारहुन आलेल्या दोघांना अटक, 2 पिस्टलसह 20 काडतूस जप्त

आरोपी नक्षलवाद्यांना शस्त्रांचा पुरवठा करीत असावे, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे

  • Share this:

प्रवीण मुधोळकर, प्रतिनिधी

नागपूर, 25 जानेवारी : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व रात्री बिहार येथील एका तरुणासह दोन जणांना दोन पिस्टल आणि 20 काडतुसांसह रेल्वे स्टेशन इथं अटक करण्यात आली आहे. ही कार्यवाई दहशतवाद विरोधी पथकाने केली असून, सदर आरोपी माओवाद्यांना शस्त्रांचा पुरवठा करीत असावे, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

संजय संदीपन खरे( वय 43) आणि सुपतसिंग (वय 49) अशी अटक आरोपींची नावे आहेत. संजय खरे हा ड्रायव्हर असून, त्याला यापूर्वीही पिस्टलसह पकडण्यात आले असल्याचं सुत्रांनुसार समजते. अटक करण्यात आलेले आरोपी बिहार येथून शस्त्र घेऊन नागपूर रेल्वे स्टेशन येथे आले असल्याची गुप्त माहिती दहशतवाद विरोधी पथक नागपूर यांना २४ जानेवारी रोजी रात्री मिळाली.

यावरून त्यांनी रेल्वे स्टेशन इथं सापळा रचून दोघांनाही पकडलं. झडतीत त्यांच्या ताब्यातून देशी बनावटीचे दोन पिस्टल आणि 20 जिवंत काडतूस आढळून आले आहे. सुपतसिंग हा संजयसोबत आला असल्याचं त्याचं म्हणणं आहे. सदर आरोपीं नक्षली अथवा अन्य असामाजिक तत्वांना शस्त्राचा पुरवठा करीत असावे, असा पोलिसांचा संशय आहे.

याप्रकरणी एटीएस मुंबई इथं गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. या गुन्ह्याच्या तपासासाठी आरोपींना 28 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

=================

First published: January 25, 2019, 9:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading