यवतमाळमध्ये शिवशाही बस उलटली, 2 ठार

यवतमाळमध्ये शिवशाही बस उलटली, 2 ठार

या अपघातात 2 जण ठार झाले असून 18 जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

  • Share this:

यवतमाळ, 30 मे : एसटी महामंडळाकडून दिमाखात सुरू झालेल्या शिवशाही बसला लागलेलं अपघाताचे ग्रहण काही सुटायचं नाव घेत नाहीये. नागपूर-तुळजापूर राज्य महामार्गावर शिवशाही बसला अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू झालाय.

यवतमाळहुन-नागपूरकडे जाणाऱ्या शिवशाही बसचा नागपूर तुळजापूर राज्य महामार्गावरील बेलोना गावाजवळ अपघात झाला. या अपघातात 2 जण ठार झाले असून 18 जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

शिवशाही बस एका मोटार सायकलला ओव्हरटेक करत असताना चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ही बस  रस्त्याच्या खाली गेली आणि पलटली. यात मोटर सायकल चालक आणि बस मधील एक महिला ठार झाली तर 18 प्रवासी जखमी झाले.

First Published: May 30, 2018 08:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading