Home /News /maharashtra /

Good News: दोन रुग्ण पूर्णपणे बरे, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्यमंत्र्यांकडून अभिनंदन

Good News: दोन रुग्ण पूर्णपणे बरे, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्यमंत्र्यांकडून अभिनंदन

कोरोना व्हायरसच्या भीतीच्या दहशतीखाली वावरत असलेल्या महाराष्ट्रातील जनतेसाठी गूड न्यूज आहे.

    मुंबई, 25 मार्च: कोरोना व्हायरसच्या भीतीच्या दहशतीखाली वावरत असलेल्या महाराष्ट्रातील जनतेसाठी गूड न्यूज आहे. ती म्हणजे पुण्यातील कोरोना बाधित दाम्पत्याचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आले आहेत. ते या संसर्गातून पूर्णपणे बरे झाले आहेत. विशेष म्हणजे बुधवारी त्यांना नायडू रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी ही चांगली बातमी आल्यामुळे कोरोना बरा होऊ शकतो, असा संदेश नागरिकांमध्ये गेला. या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अभिनंदन केले आहे. हेही वाचा...'नवऱ्यांना 21 दिवसांत पोळ्या लाटायला शिकवा, बाहेर आले तर आम्ही आहोतच' दरम्यान, यापूर्वी मुंबई आणि औरंगाबाद येथील बरे झालेल्या रुग्णांनाही रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. दुसरीकडे राज्यात आज दिवसभरात 15 नवे रुग्ण आढळून आले आहेत. परिणामी कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 122 झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये मुंबईचे 7, सांगलीमधील इस्लामपूरचे 5 तर कल्याण डोंबिवली, नवी मुंबई व पनवेल येथील प्रत्येकी 1 रुग्ण आहे. या नवीन बाधित रुग्णांपैकी सांगलीचे 5 रुग्ण हे काल बाधित आढळलेल्या 4 रुग्णाचे निकट सहवासित आहेत. नवी मुंबईतील 57 वर्षीय पुरुष हा यापूर्वी करोना बाधित आढळलेल्या आणि मृत्यूमुखी पडलेल्या फिलिपाईन नागरिकाच्या संपर्कातील व्यक्ती आहे. कामोठे –पनवेल येथे आढळलेला 38 वर्षाचा पुरुष हा त्रिनिदाद येथे गेला होता. तर मुंबईतील अनुक्रमे 27 व 39 वर्षाचे दोन पुरुष रुग्ण हे अमेरिका आणि युएई या देशांमध्ये प्रवास करुन आले आहेत. तर इतर 5 रुग्ण हे बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आहेत. कल्याण-डोंबिवली परिसरातील 26 वर्षाच्या तरुणाने तुर्कस्थानचा प्रवास केलेला आहे. हेही वाचा...देवाक् काळजी रं... हातावर पोट असणाऱ्यांचे हाल, मजुरांनी पायीच धरला घरचा रस्ता राज्यातील जिल्हा आणि शहर रुग्णांचा तपशील पिंपरी चिंचवड- 12 पुणे-18 मुंबई- 48 सांगली-9 नवी मुंबई , कल्याण डोंबिवली- 6 नागपूर, यवतमाळ- प्रत्येकी 4 अहमदनगर, ठाणे- प्रत्येकी-3 सातारा, पनवेल- प्रत्येकी 2 उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, वसई विरार,पुणे ग्रामीण- प्रत्येकी 1 एकूण-122 18 जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत २९८८ जणांना भरती करण्यात आले होते. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी २५३१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १२२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १४,५०२ लोक घरगुती अलगीकरणात तर ९३२ जण संस्थात्मक अलगीकरणात आहेत. हेही वाचा...हातावर पोट असणाऱ्यांना आता  Parle G चा आधार, कंपनी वाटणार 3 कोटी पॅकेट्स आरोग्य खात्यामार्फत आवाहन -सरकारी तसेच खासगी आरोग्य संस्था मधील बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण विभाग नेहमीप्रमाणे खुले असावेत. -रुग्णालय स्तरावर फ्ल्यू सदृश्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी वेगळी ओपीडी असावी. -परदेशी प्रवासाचा इतिहास अथवा करोना बाधित रुग्णांच्या संपर्कात न आलेल्या सर्दी खोकला असलेल्या रुग्णास विनाकारण करोना चाचणीचा आग्रह धरु नये. -लॉकडाऊनच्या काळात कामानिमित्त घराबाहेर पडणा-या सामान्य नागरिकांना काही ठिकाणी पोलिस मास्क घालण्याबाबत सक्ती करत असल्याबाबत काही तक्रारी कॉलसेंटरला प्राप्त झाल्या आहेत. परदेशातून आलेले लोक, करोना बाधित रुग्ण, करोना बाधित रुग्णांच्या संपर्कात असणा-या व्यक्ती आणि मेडिकल स्टाफ या शिवाय इतर सामान्य नागरिकांनी मास्क वापरण्याची आवश्यकता नाही, त्यामुळे मास्क घालण्याबाबत अशी सक्ती कोणीही करु नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    पुढील बातम्या