मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बीडमध्ये मोठी दुर्घटना टळली, नर्सच्या सतर्कतेने 12 नवजात बालकांचे प्राण वाचले

बीडमध्ये मोठी दुर्घटना टळली, नर्सच्या सतर्कतेने 12 नवजात बालकांचे प्राण वाचले

बीडच्या (Beed) जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू वार्डात वॉर्मरच्या सॉकेटमधून धूर निघत होता. वॉर्मर शॉर्ट सर्किटने (Short Circuit) जळाल्याचा वास येऊ लागला. त्यामुळे कर्तव्यावर असलेल्या अनिता मुंडे आणि पुष्पा माने या दोघी नर्सने धावाधाव केली.

बीडच्या (Beed) जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू वार्डात वॉर्मरच्या सॉकेटमधून धूर निघत होता. वॉर्मर शॉर्ट सर्किटने (Short Circuit) जळाल्याचा वास येऊ लागला. त्यामुळे कर्तव्यावर असलेल्या अनिता मुंडे आणि पुष्पा माने या दोघी नर्सने धावाधाव केली.

बीडच्या (Beed) जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू वार्डात वॉर्मरच्या सॉकेटमधून धूर निघत होता. वॉर्मर शॉर्ट सर्किटने (Short Circuit) जळाल्याचा वास येऊ लागला. त्यामुळे कर्तव्यावर असलेल्या अनिता मुंडे आणि पुष्पा माने या दोघी नर्सने धावाधाव केली.

पुढे वाचा ...

बीड, 17 डिसेंबर : काही महिन्यांपूर्वी भंडाऱ्यातील (Bhandara) जिल्हा रुग्णालयात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत तब्बल दहा नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेमुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देश हादरला होता. विशेष म्हणजे भंडाऱ्यासारखीच भीषण आणि अंगावर काटा आणणाऱ्या घटनेची पुनरावृत्ती बीडच्या जिल्हा रुग्णालयात (Beed Civil Hospital) होण्याची शक्यता होती. पण वॉर्डातील नर्सच्या (Nurse) सतर्कतेमुळे बारा बालकांचा प्राण वाचला आहे. या घटनेनंतर रुग्णालयातील नर्स आणि इतर स्टाफच्या कामाचं कौतुक केलं जात आहे.

नेमकं काय घडलं?

बीडच्या जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू वार्डात वॉर्मरच्या सॉकेटमधून धूर निघत होता. वॉर्मर शॉर्ट सर्किटने जळाल्याचा वास येऊ लागला. त्यामुळे कर्तव्यावर असलेल्या अनिता मुंडे आणि पुष्पा माने या दोघी नर्सने धावाधाव केली. धूर निघणारा वॉर्मर आणि इतर सर्व 13 वॉर्मरचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. वॉर्मरमधील बालकांना इतरत्र हलवले. हा प्रकार गुरुवारी (16 डिसेंबर) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडला. नर्सेसच्या सतर्कतेमुळे बीडचे भंडारा होता होता वाचले.

धूर निघत असल्याचे दिसताच मुंडे यांनी पुष्पा माने यांना जोरात आवाज दिला. "मी बाळ उचलते तू लवकर लाईट बंद कर", असं मुंडे म्हणाल्या. माने यांनी कसलीही परवा न करता सर्वच वीजपुरवठा क्षणात बंद केला तर मुंडे यांनी इतर बालकांना सुरक्षित केले. तसेच दोघींनी डॉक्टर-वरिष्ठांना याची माहिती दिली. वॉर्मरला गरम होण्यासाठी वरच्या बाजूला मधोमध कॉईन असतो. त्याला अचानक वीज कमी जास्त झाल्याने कॉईन गरम झाला. त्यात जाळ लागला असता तर स्पॉट झाला असता. त्यातच एसएनसीयू विभागात एसी आणि ऑक्सिजन पुरवठा, लाईट असल्याने मोठी दुर्घटना घडली असती. मात्र सुदैवाने नर्सच्या समयसूचकतेमुळे दुर्घटना टळली.

हेही वाचा : राज्य सरकारला आणखी एक धक्का, निवडणुका वेळेनुसारच होणार, निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी फेटाळली

नर्स अनिता मुंडे यांची प्रतिक्रिया

या भीषण दुर्घटनेतून बालकांची सुखरुप सुटका केल्यानंतर आम्ही कार्यावर असलेल्या नर्स अनिता मुंडे यांची प्रतिक्रिया घेतली. यावेळी त्यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला. "मी लहान मुलांना दूध फीड करत असताना अचानक वायर जळाल्याचा वास आला. मी चेक केलं तेव्हा एक नंबरच्या वॉर्मरमधून धूर निघत होता. त्यावेळी लगेच मी माने सिस्टरला आवाज दिला. मी मुलांना उचलते. तुम्ही वॉर्मर बंद करा, असं सांगितलं. त्यावेळी आम्ही सर्वच वॉर्मरच्या पिना काढल्या. तसेच तातडीने डॉ. इलियास सरांना बोलावलं. इतर वॉर्मरपासून दुसरे वॉर्मर दूर केले. त्यामुळे अनर्थ टळला", असं अनिता मुंडे यांनी सांगितलं.

'लगेच इलेक्ट्रिशन आणि बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलवलं'

"डॉ. इलियास सरांचा राऊंड झाल्यानंतर मी आणि अनिता बाळाला दूध पाजत होतो. त्यावेळी वास आल्याने काहीतरी जळत आहे असं आमच्या लक्षात आलं. त्यावेळी अनिता यांनी मला हाक देऊन वॉर्मर बंद कर मी मुलांना उचलून घेते असं सांगितलं. त्यावेळी खूप धावपळ झाली. लगेच इलेक्ट्रिशन आणि बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलवलं. विद्युत कनेक्शन कट केले नसते तर मोठा अनर्थ झाला असता", अशी प्रतिक्रिया नर्स पुष्पा माने यांनी दिली.

हेही वाचा : धक्कादायक!Online classसुरू असतानाच Smartphoneचा स्फोट आणि विद्यार्थ्याचा जबडा...

'सतर्कतेमुळे होणारा अनर्थ टळला'

"एसएनसीयू वार्डाच्या समोर आम्ही पालकांची कौन्सिलिंग करत होतो. त्यावेळी अतुल माने सिस्टरचा आवाज आल्याने आम्ही मध्ये गेलो. त्यावेळेस एक नंबरच्या वॉर्मरमधून धूर निघत होता. माने सिस्टर आणि मुंडे सिस्टर यांनी समय सूचकता दाखवत विद्युत पुरवठा खंडित केला. नंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करुन बोलवून घेतले. मात्र सतर्कतेमुळे होणारा अनर्थ टळला", असे एसएनसीयू विभागाचे प्रमुख डॉ. इलियास खान यांनी सांगितले.

'कर्मचारी सतर्क असल्याने दुर्घटना टळली'

एसएनसीयु विभागात पहिल्या वॉर्मरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यावेळी कर्मचारी सतर्क होते म्हणून दुर्घटना टळली. भंडारा आणि अहमदनगरच्या पार्श्वभूमीवर आम्ही जिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचारी आणि डॉक्टरांचे फायर संदर्भातील प्रशिक्षण घेतले आहे. त्यामुळे समयसूचकता दाखवत मुंडे आणि माने नर्स यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली, असं जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी सांगितलं.

First published: