• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • भिवंडीत 12 तासांत 2 मर्डर, अनैतिक संबंधातून पतीनं पत्नीला संपवलं तर...

भिवंडीत 12 तासांत 2 मर्डर, अनैतिक संबंधातून पतीनं पत्नीला संपवलं तर...

महिलेची परपुरुषासोबतची आक्षेपार्ह व्हिडीओ क्लिप परिसरात झाली होती व्हायरल

  • Share this:
भिवंडी, 5 नोव्हेंबर: भिवंडी शहरात (Bhiwandi city )12 तासांत दोन हत्येच्या (Murder ) घटना समोर आल्या आहेत. पहिल्या घटनेत अनैतिक संबंधातून पतीनं पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. तर दुसऱ्या घटनेत चोरी करताना रंगेहात पकडून जमावानं बेदम मारहाण करून चोरट्याला ठार मारलं. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. भिवंडीत अनैतिक संबंधातून पत्नीची हत्या... भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरात बहिणीच्या घरी राहायला आलेल्या महिलेची अनैतिक संबंधातून तिच्या पतीनं निर्घृण हत्या केली आहे. भिवंडी शहरातील अन्सार नगर भागात घडली आहे. नसरीन रफिक खान (वय-38) असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. तर तिचा पती रफिक खान-50) याला शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे. हेही वाचा...  पुणे- सोलापूर महामार्गावर सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! मराठी तरुणीसह तिघींची सुटका मिळालेली माहिती अशी की, पत्नी नसरीन हिचे दोन वर्षांपासून एक परपुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याची कुणकुण पती रफिक याला लागली होती. यावरून दोघांचं भांडण सुरू होतं. त्यातच पत्नीचे सद्दाम या परपुरुषासोबत आक्षेपार्ह व्हिडीओ क्लिप परिसरात व्हायरल झाल्यानं आपल्याला बेअब्रू केल्याच्या रागातून रफिक यांनी घारधार शस्त्रानं पत्नीवर वार करून तिची निर्घृण हत्या केली. घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी पती रफिक याला अटक केली. दरम्यान, गेल्या दहा महिन्यात पतीनं पत्नीची हत्या केल्याची ही पाचवी घटना आहे. मारहाणीत चोरट्याचा मृत्यू... दुसऱ्या एका घटनानेत चोरट्याचा मारहाणीत मृत्यू झाला आहे. भिवंडी शहर परिसरात चोरांचा सुळसुळाट वाढला असून चोरी करण्याच्या हेतूनं आलेल्या चोरट्याला पकडून त्याला केलेल्या मारहाणीमध्ये चोरट्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बालाजी नगर परिसरात घडली. या हत्येप्रकरणी नारपोली पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. अजय वर्मा (वय-29), अश्रफ खान (वय-24) आणि सुरज वर्मा (वय-27) अशी आरोपींची नावं आहेत. तर समसुद्दिन मोहम्मद शेख ( वय-26, रा लाहोटी कंपाउंड) असं मृत चोरट्याचं नाव आहे. मृत तरुणाच्या विरोधात चोरी व घरफोडीसारखे चार गुन्हे पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत. शहरातील नारपोली पोलीस स्टेशन अंतर्गत बालाजीनगर परिसरामध्ये असलेल्या एका खानावळमध्ये बुधवारी पहाटे चोरीच्या हेतूनं गेला असता खानावळमध्ये झोपलेल्या कामगारांनी चोराला बाहेर निघत असताना पाहिले व आरडाओरडा करून कामगारांना तसेच मालकाला उठवून चोराला पकडलं. त्याला बेदम मारहाण केली. हेही वाचा..बापानंच केलं पोटच्या मुलीला विधवा, प्रेमविवाह केल्याच्या रागातून जावयाचा खून यादरम्यान, समसुद्दिन शेख यास वर्मी मार लागल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली. नंतर मारहाण करणाऱ्या आरोपींनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. गंभीर मारहाण झालेल्या समसुद्दीन यास तात्काळ भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या हत्येप्रकरणी पोलिसांनी खानावळ मालक व त्याच्या दोन कर्मचाऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक केली आहे.
Published by:Sandip Parolekar
First published: