• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • नको ते धाडस जीवावर बेतले, अंबरनाथमधील चिखलोली धरणात 2 मित्र बुडाली

नको ते धाडस जीवावर बेतले, अंबरनाथमधील चिखलोली धरणात 2 मित्र बुडाली

रविवारीची सुट्टी असल्याने सार्थक ओमले आणि महादेव मिस्त्री ही १६ वर्षीय मुलं धरणात पोहण्यासाठी गेली होती.

  • Share this:
अंबरनाथ, 14 नोव्हेंबर : पाण्याचा अंदाज येत नसेल तर पोहण्याचं धाडस करू नका, असा सल्ला वारंवार दिला जात असतो. पण, तरी अशा घटना घडतच आहे. अंबरनाथमध्ये (Ambernath) चिखलोली धरणात (Chikhloli dam) पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलं बुडाल्याची घटना घडली आहे. या दोघांचाही मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथमधील चिखलोली धरणात आज संध्याकाळी ही घटना घडली. रविवारीची सुट्टी असल्याने सार्थक ओमले आणि महादेव मिस्त्री ही १६ वर्षीय मुलं धरणात पोहण्यासाठी गेली होती. T20 World Cup : ज्याला टीममधून काढलं त्याने 48 दिवसांमध्ये घेतला विलियमसनचा बदला मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात दोघेही बुडाले. दोघेही अंबरनाथच्या महालक्ष्मी भागात राहतात. अंबरनाथ अग्निशमन दलाच्या जवानांकडून दिवसभर या मुलांचा शोध घेतला गेला, मात्र अजूनही त्यांचा शोध लागला नाही. 1 कोटीला विकला गेला बैल; तर 1 हजारात स्पर्मचा डोज, काय आहे खासियत? दरम्यान, अंधार झाल्याने आता शोधकार्य थांबवण्यात आले आहे. सोमवारी सकाळी पुन्हा शोधकार्य केले जाणार आहे. या घटनेनंतर महालक्ष्मी नगर भागात सार्थक आणि महादेवच्या घरी त्याचे कुटुंबीय चिंतेत आहेत. ट्रॅक्टरच्या धडकेत वाचले पण ट्रकनं चिरडलं; जीवलग मित्रांचा मृत्यू तर दुसरीकडे, कोल्हापूरमध्ये दोन जीवलग मित्रांच्या मृत्यूची दुर्दैवी घटना घडली आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यात गडहिंग्लज मार्गावर झालेल्या अपघातात दोन जीवलग मित्रांचा हृदयद्रावक मृत्यू झाला आहे. उसाच्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत असताना, ट्रॉलीला धडकून खाली पडलेल्या दोन तरुणांना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकनं चिरडलं आहे. या दुर्दैवी घटनेत दोन्ही तरुणांचा जागीचं मृत्यू झाला आहे. पत्नीसोबत अवैध संबंधातून पतीने रचला कट; दाम्पत्याने मजुराला दिला भयावह शेवट जय ज्योतिबा मासरणकर (वय-19) आणि अजित आप्पाजी पाटील (वय-18) असं मृत पावलेल्या दोन्ही तरुणांची नावं असून ते दोघंही चंदगड तालुक्यातील सातवणे येथील रहिवासी होते. दोघंही कॉलेजचे चांगले मित्र होते. शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास जय आणि अजित इलेक्ट्रिक साहित्य घेऊन दुचाकीने अडकूर येथून आपल्या गावी सातवणेला निघाले होते त्यावेळी अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
Published by:sachin Salve
First published: