मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /प्रेमापोटी बापाने आणला खाऊ, खाताच चिमुकल्या बहिणींनी तडफडून सोडला प्राण, मन हेलावणारी घटना

प्रेमापोटी बापाने आणला खाऊ, खाताच चिमुकल्या बहिणींनी तडफडून सोडला प्राण, मन हेलावणारी घटना

Crime in Solapur: मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. वडिलांनी आणलेला खाऊ खाताच येथील दोन चिमुकल्या बहिणींचा दुर्दैवी अंत झाला आहे.

Crime in Solapur: मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. वडिलांनी आणलेला खाऊ खाताच येथील दोन चिमुकल्या बहिणींचा दुर्दैवी अंत झाला आहे.

Crime in Solapur: मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. वडिलांनी आणलेला खाऊ खाताच येथील दोन चिमुकल्या बहिणींचा दुर्दैवी अंत झाला आहे.

मंगळवेढा, 27 डिसेंबर: मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. वडिलांनी आणलेला खाऊ खाताच येथील दोन चिमुकल्या बहिणींचा दुर्दैवी अंत झाला (two minor sisters died after eating sweets) आहे. विषबाधेमुळे (Food poisoning) संबंधित मुलींचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अवघ्या काही तासांच्या अंतराने दोन चिमुकल्या बहिणींचा अशाप्रकारे अंत झाल्याने गावात खळबळ उडाली असून अनेकांनी हळहळ व्यक्त केली जात आहे.

स्वरा आबासाहेब चव्हाण (वय- 6) आणि नम्रता आबासाहेब चव्हाण (वय-4) असं मृत पावलेल्या दोन चिमुकल्या बहिणींची नावं आहेत. घटनेच्या दिवशी 22 डिसेंबर रोजी चिमुकल्या बहिणींनी आपल्या वडिलांकडे खाऊ आणण्यासाठी हट्ट केला होता. लेकींच्या प्रेमापोटी वडील आबासाहेब चव्हाण गावातील एका दुकानातून श्रीखंड, बासुंदी, पनीर आणि रबडी असे पदार्थ आणले. हे पदार्थ मुलींनी खाताच त्यांना त्रास होऊ लागला.

हेही वाचा- धक्कादायक! संशयी पत्नीचं विकृत कृत्य; पतीला गावातील अल्पवयीन मुलीवर करायला लावला बलात्कार

त्यामुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी त्वरित दोन्ही बहिणींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. पण याठिकाणी उपचार सुरू असताना बुधवारी रात्री मोठी मुलगी 6 वर्षीय स्वरा हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर गुरुवारी रात्री 4 वर्षीय नम्रता हिलाही त्रास होऊ लागला आणि यातच तिचाही मृत्यू झाला. दोन सख्ख्या चिमुकल्या बहिणींचा अशाप्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने मरवडे गावात शोककळा पसरली असून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

हेही वाचा-पत्नीचे नोकरासोबत अवैध संबंध; संतापलेल्या व्यावसायिकाची विष खाऊन आत्महत्या

मृत मुलींचे वडील आबासाहेब चव्हाण हे स्कूल बस चालक आहेत. गेल्या 15 वर्षांपासून ते हेच काम करत आहेत. हुलजंती, मरवडे भागातील शेकडो लहान मुलांना ते मंगळवेढा येथील इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये सोडण्याचं आणि परत घरी आणण्याचं काम करतात.

First published:

Tags: Crime news, Solapur