Home /News /maharashtra /

Jalgaon : मकरसंक्रांतीच्या दिवशी जळगावात दोन चिमुकल्यांचा मृत्यू

Jalgaon : मकरसंक्रांतीच्या दिवशी जळगावात दोन चिमुकल्यांचा मृत्यू

जळगावमध्ये पतंग उडविण्याच्या इच्छेमुळेच दोन चिमुरड्यांचा मृत्यू (two minor boys death) झाला आहे. पतंग उडवताना शॉक लागून एकाचा मृत्यू झालाय तर दुसऱ्याला पतंग उडवू दिली नाही म्हणून त्या चिमुकल्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केलीय.

पुढे वाचा ...
जळगाव, 14 जानेवारी : देशभरात आज मकरसंक्रात (Makar Sankranti) सणाचा उत्साह असताना जळगावात (Jalgaon) दोन वेगवेगळ्या अनपेक्षित आणि वाईट घटना घडल्या आहेत. मकरसंक्रांतीच्या सणानिमित्ताने लहान मुलं पतंग (Kite) उडवतात. त्यांच्यात पतंग उडविण्याचा एक वेगळाच उत्साह संचारलेला असतो. पण पतंग उडवताना किंवा कापली गेलेली पतंग पकडताना काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. याशिवाय पतंग उडविणं हे आपल्या जीवापेक्षा जास्त जरुरीचं आहे का? याचीदेखील योग्य माहिती पालकांनी मुलांना योग्यवेळी द्यायला हवी. अन्यथा पश्चात्ताप करण्याशिवाय हातात काही शिल्लक राहत नाही. जळगावमध्ये पतंग उडविण्याच्या इच्छेमुळेच दोन चिमुरड्यांचा मृत्यू (two minor boys death) झाला आहे. पतंग उडवताना शॉक लागून एकाचा मृत्यू झालाय तर दुसऱ्याला पतंग उडवू दिली नाही म्हणून त्या चिमुकल्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केलीय. जळगावच्या कांचननगरमध्ये पहिली घटना जळगाव शहरातील कांचननगरमध्ये चिमुकल्याच्या मृत्यूची पहिली दुर्देवी घटना घडली. आज मकरसंक्रांत असल्यामुळे पतंग उडवण्यासाठी जाऊ दिले नाही या कारणाने 12 वर्षीय मुलाने झोक्याच्या दोरीने स्वत:ला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती जेव्हा चिमुकल्याच्या कुटुंबियांना मिळाली तेव्हा त्यांनी प्रचंड आक्रोश केला. चिमुकल्याने एवढ्या क्षुल्लक कारणामुळे आत्महत्येसारखा टोकाचा पाऊल उचलायला नको होता, असं मत परिसरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येतंय. चिमुकल्याच्या कुटुंबियांचा आक्रोश बघून परिसरातील नागरिकांच्या डोळ्यांमध्येही पाणी आलं. दरम्यान, याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी पुढील तपास करत आहेत. (दिल्लीत गाझीपूरच्या मार्केटमध्ये IED स्फोटकं, निष्क्रिय करण्याचं ऑपरेशन सुरु) शॉक लागून चिमुकल्याचा मृत्यू जळगावच्या कांचननगरमध्ये एका चिमुकल्याच्या मृत्यूची घटना ताजी असताना कुसुंबा गावातदेखील दुसऱ्या एका चिमुकल्याच्या मृत्यूची घटना घडली. पतंग उडवित असताना पतंग विजेच्या तारांमध्ये अडकल्यामुळे आठ वर्षीय चिमुकल्याचा विजेच्या तारेला स्पर्श झाल्यामुळे मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. संबंधित घटनेची माहिती तातडीने मृतक चिमुरड्याच्या कुटुंबियांना देण्यात आली. चिमुकल्याच्या कुटुंबियांनी घटनास्थळी भेट दिली तेव्हा मुलाचा मृतदेह बघून टाहो पडला.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या