जळगाव, 22 मार्च: कोरोना व्हायरसने संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार उडाला असताना जिल्ह्यात संशयीत रुग्ण आढळून आले आहे. सुदैवाने पॉझिटीव्ह रूग्ण अद्याप आढळून आलेला नाही. तरी देखील पाचोरा शहरात कोरोना पॉझिटीव्ह असलेला एक जण फिरत असल्याचा खोटा संदेश सोशल मीडियावरून व्हायरल झाला. याप्रकरणी दोन जणांविरूद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे रविवारी जनता कर्फ्यू पाळण्यात आला. यामुळे सर्वत्र शांतता होती. सर्व नागरिक घरातच थांबलेले होते. घरात थांबून सारेजण मोबाईलवर अपडेट पाहत होते. अशात व्हॉटस्ऍपवर कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण सापडला असून सावधान. अशा आशयाचा संदेश प्रत्येक ग्रुपवर फिरू लागला होता. यामुळे नागरीकांमध्ये भीती निर्माण झाली होती. यामुळे प्रशासन देखील हादरले होते. परंतु याचा शोध घेतला असता संदेश खोटा असल्याची खात्री झाली.
हेही वाचा.. पुण्यात कोरोनाच्या भीतीने आईने घरात कोंडलेल्या मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न
सोशल मीडियावर पाचोरामध्ये कोरोना पॉझिटिव्ह सापडला. गंगा सुपरचा मुलगा सावधान.. अशा आशयाचा इंग्रजी भाषेतील खोटा व भीती निर्माण करणारा संदेश व्हायरल करण्यात आला. त्यामुळे शहर व तालुक्यातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली. पोलिस हवालदार सुनील पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार प्रवीण बच्छाव (गाडगेबाबानगर पाचोरा) व दत्तू पाटील (जारगाव, ता. पाचोरा) या दोघांविरुद्ध पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार राहुल सोनवणे करीत आहेत.
हेही वाचा.. कोरोनाचा फटका, नाशिकच्या कारखान्यात नोटांची छपाई बंद'जनता कर्फ्यू'च उल्लंघन, 55 जणांवर कारवाई
महाराष्ट्रासह भारतावर कोरोना व्हायरसचं संकट घोंगावत आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या आजच्या जनता कर्फ्यूला देशातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी गच्चीवर, घराबाहेर व बाल्कनीजवळ येऊन टाळ्या, थाळीनाद कोरोनाशी दोन हात करणारे डॉक्टर, पोलिस आणि प्रशासनाचे आभार मानले. मात्र, नवी मुंबई आणि पनवेल येथे मात्र, जनता कर्फ्यूच उल्लंघन करणाऱ्या 18 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी 55 जणांना ताब्यात घेतलं असून नियम मोडल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.