मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /लेकींसाठी आवडीने खाऊ आणला अन् त्यानेच हिरावले 2 चिमुकल्या बहिणींचे आयुष्य

लेकींसाठी आवडीने खाऊ आणला अन् त्यानेच हिरावले 2 चिमुकल्या बहिणींचे आयुष्य

. 6 आणि 4 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

. 6 आणि 4 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

6 आणि 4 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सोलापूर, 24 डिसेंबर : घरात लहान लेकरांसाठी आपण नेहमी काही ना काही खायला आणतो. पण, बाजारातून आणलेल्या खाद्यपदार्थामुळे दोन लहान मुलींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील समोर आली आहे.   मंगळवेढा (mangalwedha) तालुक्यातील मरवडे येथे अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे दोन सख्या बहिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 6 आणि 4 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  भक्ती आबासाहेब चव्हाण ( वय- 6) व नम्रता आबासाहेब चव्हाण ( वय-4) अशी दोन चिमुकल्या मुलींची नाव आहे.  मरवडे येथील आबासाहेब चव्हाण यांनी आपल्या भक्ती व नम्रता या लहान मुलींसाठी  मंगळवारी मंगळवेढा येथील बाजारात गेले होते. येताना आपल्या दोन्ही लेकींसाठी त्यांनी एका दुकानातून खाऊ आणला होता.

प्रिटेंड पेपरमध्ये खाद्यपदार्थ गुंडाळणं बॅन; बळावू शकतो कॅन्सरसारखा भयंकर आजार

घरी आल्यानंतर त्यांनी आपल्या दोन्ही मुलींना खाऊ दिला. मुलींसोबत घरातील इतर सदस्यांनीही खाऊ खाल्ला. पण काही वेळानंतर हा खाऊ खाल्यानंतर चव्हाण कुटुंबातील सर्वांनाच अस्वस्थ वाटू लागले. मळमळ आणि उलट्यांचा त्रा जाणवू लागला. त्यामुळे चव्हाण  कुटुंबातील सदस्य मंगळवेढा व पंढरपूर येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल झाले.

37 वर्षांच्या पुरुषाने दिला बाळाला जन्म

उपचारादरम्यान गुरुवारी पहाटे आबासाहेब चव्हाण यांची मोठी मुलगी भक्ती हिचा मृत्यू मंगळवेढा येथील खाजगी दवाखान्यात झाला. तर दुसरी मुलगी नम्रता हिचा मृत्यू गुरुवारी मध्यरात्री पंढरपूर येथील खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान झाला. दोन्ही मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मयत मुलीचे वडील आबासाहेब व आई सुषमा यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत. या घटनेचा मंगळवेढा पोलीस ठाण्याकडून तपास केला जात आहे.

First published: