भरधाव कार पुलावरून नदीत कोसळताच फसली गाळात, तरुण-तरुणीचा मृत्यू

भरधाव कार पुलावरून नदीत कोसळताच फसली गाळात, तरुण-तरुणीचा मृत्यू

भरधाव कार पुलावरून नदीत कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतामध्ये तरुणीचा समावेश आहे.

  • Share this:

नांदेड, 20 सप्टेंबर: भरधाव कार पुलावरून नदीत कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतामध्ये तरुणीचा समावेश आहे. माळेगाव-नांदेड रस्त्यावरील आसना नदीच्या पुलावरून ही कार कोसळली होती. रविवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा...

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलिसांनी क्रेनच्या मदतीनं नदीतून कार बाहेर काढण्यात आली आहे. कारमध्ये तरुण-तरुणीचा मृतदेह सापडला आहे. दोघांच वय 25 ते 26च्या जवळपास आहे. हरविंदर सिंग लड्डा (वय-26) अशी तरुणाची ओळख पटली आहे. मात्र, अद्याप तरुणीची ओळख पटली नाही. या प्रकरणी लिंबगाव पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.

नदीत कोसळताच काळात फसली कार..

हरविंदर सिंग लड्डा हा तरुण नांदेड शहरातील गुरुद्वारा परिसरात राहत होता. तो शनिवारी रात्री उशीरा माळेगावहून कारने नांदेडकडे येत होता. त्याच्या कारमध्ये एक तरुणीही होती. कार आसना नदीच्या पुलावर येतात चड्डा याचा कारवरील ताबा सुटला असावा आणि कार थेट नदीत कोसळली असावी. मात्र, सध्या नदीला पूर असल्यानं सदर कार गाळात फसली. त्यामुळे चड्डा आणि तरुणीला बाहेर निघता आलं नसावं, त्यात दोघांचा मृत्यू झाला असावा, अशा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हेही वाचा...

रविवारी सकाळी कार नदीच्या पाण्यात अर्धवट तरंगताना आढळून आली. शेजारी असलेल्या पासदगाव येथील गावकऱ्यांनी ही माहिती पोलीस पाटील यांना दिली. घटनास्थळी लिंबगाव पोलीस पोहोचून क्रेनच्या मदतीनं कार नदीतून बाहेर काढण्यात आली. कारमध्ये तरुण-तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. लिंबगाव पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी लिंबगाव स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: September 20, 2020, 6:22 PM IST
Tags:

ताज्या बातम्या