• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • शेतात सोनं सापडलं विकत घेणार का? म्हणून दोन सराफांना घातला 6 लाखांना गंडा, अखेर...

शेतात सोनं सापडलं विकत घेणार का? म्हणून दोन सराफांना घातला 6 लाखांना गंडा, अखेर...

या कारवाईत 6 लाख 46 हजार 500 रूपयांची रोकड व 1 किलो 632 ग्रॅम वजनाचे पिवळया रंगाचे धातूचे ओम पान, 964 ग्रॅम वजनाचे पिवळया रंगाची धातूची माळ...

  • Share this:
धुळे, 31 जुलै : शेतात सोनं (gold) सापडल्याच्या बनावट कहाण्या रचून ते सोनं विक्री करुन 2 व्यापार्‍यांना 6 लाखात गंडविणार्‍या राजस्थानच्या दोघा भामट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या (dhule police) पथकाने रंगेहात पकडले आहे. दोघांकडून बनावट सोनं व रोकडसह 6 लाख 67 हजारांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळनेर येथील गुळ व्यापारी दीपक प्रभाकर भामरे (वय 52 रा. शनी गल्ली, पिंपळनेरता. साक्री) यांच्या दुकानात 18 जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास एक अनोळखी इसम आला. त्याने पैशांची गरज असल्याचे सांगून त्याच्याजवळचे सोन्याचे पदक खरेदी करण्याची भामरेंना विनंती केली. त्यानुसार, भामरेंनी ते पदक खरेदी केले. याबाबत माहिती घेताना भामट्याने त्याचे नाव राजु मिस्तरी असं सांगून मला शेतामध्ये सोनं मिळालं आहे,  ते विकत घेण्याचा आग्रह केला. त्यास भामरे यांनी होकार दिल्यानंतर त्या इसमाने 30 जुलै रोजी साक्री येथे बोलवून त्यांच्याकडून 4 लाख रुपये घेवून त्यांना दीड किलो बनावट सोन्याचे पान देवून तेथून पोबारा केला. zika virus maharashtra : पुण्यात आढळलेल्या पहिल्या रुग्णाची माहिती आली समोर तत्पुर्वी 29 जुलै रोजी पंकज हिरामण गंगावणे (रा.अलियाबाद ता. सटाणा जि.नाशिक) यांच्याकडून सुद्धा त्या भामट्याने अडीच लाख रूपये घेवून त्यांना बनावट सोने देवून त्यांचीही फसवणूक केली होती. वरील दोन्ही घटनेबबत पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. ही माहिती सहाय्यक निरीक्षक सचिन साळुंखे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना कळविली. त्यानुसार, बुधवंत यांनी पथक बनवून भामट्यांचा शोध सुरू केला. त्यात त्यांना यश आले. धुळ्यातील सुरत वळण रस्त्यावरील एका हॉटेलच्या पाठीमागे मोकळ्या भूखंडावर काही लोकं झोपडी टाकून राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या पथकाने अचानक तेथे छापा मारला. यावेळी पोलिसांना पाहून दोघे पळून गेलेत. तर जितेंद्रकुमार लालारामजी वाघोला (वय 35, रा.पंचायत वाली गली बागरा,तहसिल, जि. जालोर, राजस्थान) व मांगीलाल हिराराम वाघरी (वय42) यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली. एस.बी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर इथे प्रोफेसर पदासाठी नोकरीची संधी या कारवाईत 6 लाख 46 हजार 500 रूपयांची रोकड व 1 किलो 632 ग्रॅम वजनाचे पिवळया रंगाचे धातूचे ओम पान, 964 ग्रॅम वजनाचे पिवळया रंगाची धातूची माळ, पांढऱ्या रंगाचा इलेक्ट्रीक वजन काटा, 7 मोबाईल, आधारकार्ड, असा एकूण 6 लाख 67 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल दोघांकडून जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सपोनि सचिन साळुंखे, सपोनि दिलीप खेडकर, पोसई सुशात वळवी, पोहेकाँ प्रभाकर बैसाणे, रफिक पठाण, पोना अशोक पाटील, संदीप सरग, गौतम सपकाळे, राहुल सानप, पोकाँ मयुर पाटील, तुषार पारधी, श्रीशैल जाधव, सुनिल पाटील, मनोज महाजन, कविता देशमुख, भूषण वाघ, रविंद्र सुर्यवंशी यांनी ही कारवाई केली आहे.
Published by:sachin Salve
First published: