मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

रक्ताची नाती जीवावर उठली, एकाच कुटुंबातील लोकांची बॅट-स्टम्पने तुफान हाणामारी VIDEO

रक्ताची नाती जीवावर उठली, एकाच कुटुंबातील लोकांची बॅट-स्टम्पने तुफान हाणामारी VIDEO


विल्होळी गावातील राजवाडा परिसरात राहणाऱ्या गायकवाड कुटुंबीयांमध्ये ही हाणामारीची घटना घडली आहे.

विल्होळी गावातील राजवाडा परिसरात राहणाऱ्या गायकवाड कुटुंबीयांमध्ये ही हाणामारीची घटना घडली आहे.

विल्होळी गावातील राजवाडा परिसरात राहणाऱ्या गायकवाड कुटुंबीयांमध्ये ही हाणामारीची घटना घडली आहे.

  • Published by:  sachin Salve

लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी

नाशिक, 05 मार्च :  नाशिकच्या विल्होळी गावात दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून सुरू झालेल्या शाब्दिक वादाचं पुनर्वसन काही मिनिटात तुंबळ हाणामारीत झालं आणि या हाणामारीत दोनही गटातील सात ते आठ जण गंभीर जखमी झाली आहे.

विल्होळी गावातील राजवाडा परिसरात राहणाऱ्या गायकवाड कुटुंबीयांमध्ये ही हाणामारीची घटना घडली आहे.  गायकवाड कुटुंबातील दोन गटामध्ये जमिनीचा निकाल एक तर्फी लागल्याच्या कारणावरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. अखेर याच वादातून मंगळवारी रात्री हे दोनही गट आमने सामने आल्याने त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत लाठ्या काठ्यासह धारदार शस्त्राचाही वापर करण्यात आल्याने दोन्ही गटातील 7 ते 8 जण गंभीर जखमी झाले आहे.

या हाणामारीचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. या प्रकरणी नाशिकच्या तालुका पोलीस ठाण्यात दोन्ही गटा विरोधात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेतील सर्वच संशयित आरोपी जखमी असल्याने या प्रकरणी अद्याप एकालाही अटक करण्यात आलेली नाही.

हॉर्न वाजवत होता म्हणून बस ड्रायव्हरला केली बेदम मारहाण

दरम्यान, रस्त्यावरून गाडी चालवत असताना अनेकदा विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्यांचा राग तुम्हालाही येत असेल. मात्र, गुजरातच्या जामनगर येथे एक भयंकर प्रकार घडला. बसचालक सतत हॉर्न वाजवत असल्यामुळे एका महिलेने त्याची बेदम मारलं. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

महिला आपली दुचाकी चालवत असताना मागून येणारा बसचालक पुढे जाण्यासाठी हॉर्न वाजवत होता. मात्र, महिला साइड देत नसल्यामुळं बसचालकाने जोरजोरात हॉर्न वाजवण्यास सुरुवात केली. रागात महिलेनं रस्त्याच्या मध्यभागी गाडी थांबवत चालत्या बसमध्ये शिरली. महिलेनं बसमध्ये शिरताच बसचालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. बसचालकाला मारहाण करताना पाहून काही बघ्यांनी हा व्हिडिओ शूट केला. तर काहींनी या महिलेला रोखण्याचा प्रयत्न केला.

First published:

Tags: Nashik