मैत्रिणीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी धावली, पण दुर्घटनेत दोघींनीही गमावले प्राण

मैत्रिणीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी धावली, पण दुर्घटनेत दोघींनीही गमावले प्राण

समृद्धी महामार्गाच्या कामावर उच्च दाबाच्या विद्युत वाहक तारेला चिटकून दोन अल्पवयीन मुलींचा दुर्दैवी अंत झाला आहे.

  • Share this:

अहमदनगर, 26 मे : कोपरगाव तालुक्यातील जेऊरकुंभारी हद्दीत सुरू असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामावर उच्च दाबाच्या विद्युत वाहक तारेला चिटकून दोन अल्पवयीन मुलींचा दुर्दैवी अंत झाला आहे. ही घटना रविवार दि 24 मे रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली आहे. सदर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

जेऊरकुंभारी येथील धनश्री मंगेश पालवे वय पाच वर्षे आणि बेट परीसरातील प्रगती नितीन आव्हाड या दोघी आपल्या मैत्रिणींसोबत बाहेर पडल्या होत्या. समृद्धी महामार्गाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी खेळता खेळता जवळच असलेल्या उच्च दाबाच्या विद्यूत तारेला एका मुलीचा स्पर्श झाला. हे बघितल्यानंतर तिच्या सोबत असलेल्या मैत्रिणीने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला असता तीदेखील विद्युत तारेला चिटकल्याने दोघींचा जागीच करूण अंत झाला आहे.

हेही वाचा - धक्कादायक! आई दूध पाजून झोपल्यानंतर 3 महिन्यांच्या मुलाला पाण्याच्या टाकीत टाकून मारलं

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस आणि वीज वितरणचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयात पाठवले.समृद्धी महामार्गाच्या ठेकेदाराने सुरक्षा रक्षक तैनात करून खबरदारी घेतली असती तर ही घटना घडलीच नसती असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. लवकरात लवकर याठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करून ठेकेदाराने खबरदारी घ्यावी, अन्यथा काम बंद करण्याचा इशारा जेऊरकुंभारी ग्रामस्थांनी दिला आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: May 26, 2020, 9:18 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading