या मैत्रिणींना सलाम! 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून आईला श्रद्धांजली

या मैत्रिणींना सलाम! 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून आईला श्रद्धांजली

या दोघींची 10 वीची परीक्षा सुरू असताना इशाची आई नीलिमा आणि ऋतुजाची आई रुपाली यांचा दोन दिवसांच्या अंतरावर अपघाती मृत्यू झाला. आईच्या मृत्यूनंतर त्याच दिवशी पेपर देत 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत एक आदर्श घालून दिलाय.

  • Share this:

कपिल भास्कर, 14 जून : 10वीच्या परीक्षा काळात मातृशोक झालेल्या दोघी जिवलग मैत्रिणींनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळून  आपापल्या आईला श्रद्धांजली दिलीय.आईचं स्वप्नं साकारण्यासाठी न डगमगता या विद्यार्थिनींनी सर्वांसमोर एक आदर्शच घालून दिलाय.

ऋतुजा पाटील आणि इशा चौधरी या दोघी जिवलग मैत्रिणी. या दोघींच्या एका डोळ्यात अश्रू तर एका डोळ्यात आनंद दिसतोय. या दोघींची 10 वीची परीक्षा सुरू असताना  इशाची आई नीलिमा आणि ऋतुजाची आई रुपाली यांचा दोन दिवसांच्या अंतरावर अपघाती मृत्यू झाला. आईच्या मृत्यूनंतर त्याच दिवशी पेपर देत 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत एक आदर्श घालून दिलाय.

मुलींप्रमाणेच रुपाली पाटील आणि नीलिमा चौधरी ह्याही दोघी चांगल्या मैत्रिणी होत्या.बाहेरील जॉब सांभाळत त्या घरची जबाबदारीही चोख बजावत असल्यानं त्यांच्या अचानक जाण्याने परिवाराला मोठा धक्का बसला. मात्र अशा परिस्थितीत ऋतुजाला 92 टक्के तर इशाला 94 टक्के गुण मिळालेत.

आई जाण्याने मनातील दुःखाचा डोंगर बाजूला ठेवत त्यांनी संपादित केलेल्या यशाचं नाशिकमध्ये कौतुक होतंय.भविष्यात ऋतुजा डॉक्टर तर इशा पायलट झाल्यास हीच खरी त्यांच्या आईना श्रद्धांजली असेल असंच म्हणता येईल.

First published: June 14, 2017, 9:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading