जीवलग मित्राला बुडताना पाहून मदतीला धावला, पण नियतीने डाव साधला, नाशिकमधील दुर्दैवी घटना

जीवलग मित्राला बुडताना पाहून मदतीला धावला, पण नियतीने डाव साधला, नाशिकमधील दुर्दैवी घटना

नजीकच असलेल्या ग्रामस्थांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने तलावाकडे धाव घेतली. पण, तोपर्यंत उशीर झाला होता.

  • Share this:

नाशिक, 02 नोव्हेंबर : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील मुंगसे-टाकळी शिवारातील कुरण तलावात (Kuran dam) पोहोण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रविवारी 1 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली आहे.

राहुल राजेंद्र सागर (वय 19) व प्रसाद खंडेराव सूर्यवंशी (वय 19, दोघे रा. मुंगसे) असं मृत झालेल्या तरुणांची नाव आहे. दोन तरुण मुलांच्या मृत्यूमुळे मुंगसे गावावर शोककळा पसरली आहे.

आता दिवाळीत प्रत्येक पेमेंटवर मिळवा कॅशबॅक, या बॅंकेने आणली '30 वर ट्रीट' योजना

परतीच्या पावसामुळे  मुंगसे-टाकळी  आणि वाके या गावांजवळ असलेलं कुरण तलाव पूर्णपणे भरले आहे. काही अतंरावरच मृत तरुणाच्या कुटुंबीयांची शेती होती. रविवारी प्रसाद आणि राहुल हे दोघेही मित्र शेतात भेटले होते. त्यानंतर फिरफिरत दोघेही जण तलावाकडे गेले. दोघे तलावाच्या किनाऱ्यावर अंघोळी करण्यासाठी उतरले. पण, एकाला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे एक जण बुडू लागला. त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या मित्राने धाव घेतली. पण, दोघेही जण पाण्यात बुडाले. नजीकच असलेल्या ग्रामस्थांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने तलावाकडे धाव घेतली. पण, तोपर्यंत उशीर झाला होता. दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.

राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी फायनल, उर्मिला मातोंडकर, शरद पोंक्षेंचा पत्ता कट

ग्रामस्थांनी दोघांचे मृतदेह बाहेर काढले आणि तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण, डॉक्टरांनी तपासून दोघांना मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदन केल्यानंतर दोघांचेही मृतदेह रात्री मुंगसे गावात आणण्यात आले. अत्यंत शोकाकुल वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी  तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

मृत प्रसाद हा खंडेराव सूर्यवंशी यांचा एकुलता एक मुलगा होता. तर राहुलला एक भाऊ आहे. एकुलत्या मुलाच्या अकाली निधनामुळे सूर्यवंशी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Published by: sachin Salve
First published: November 2, 2020, 11:32 AM IST

ताज्या बातम्या