महाशिवरात्रीलाच 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्येनं बीड हादरलं

महाशिवरात्रीलाच 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्येनं बीड हादरलं

महादेव भोसले यांच्या आत्महत्येनं त्यांच्या दोन लहान मुलांचं पितृछत्र हरपलं आहे.

  • Share this:

बीड, 4 मार्च : महाशिवरात्रीच्या दिवशीच बीड जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. येथील महादेव रामभाऊ भोसले ( 35 वर्ष)आणि दामू गणपती शिंदे (45 वर्ष) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचं नाव आहे.

खर्डेवाडी इथल्या महादेव रामभाऊ भोसले या तरुण शेतकऱ्याने गळफास लावून आपलं जीवन संपवलं आहे. कुटुंबाची जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर होती. सततची नापिकी आणि त्यातून झालेला कर्जबाजारीपणा यामुळे महादेव भोसले काही दिवसांपासून त्रस्त होते. यामुळेच महादेव यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचं त्यांचे नातेवाईक सांगत आहेत.

महादेव भोसले यांच्या आत्महत्येनं त्यांच्या दोन लहान मुलांचं पितृछत्र हरपलं आहे. शितल(वय 13 )आणी कृष्णा (वय 6)अशी त्यांच्या मुलांची नावं आहेत. तरूण शेतकऱ्याने आपलं जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बीडमध्ये शेतकरी आत्महत्येची दुसरी घटना वडवणी तालुक्यातील पिंपरखेड इथं घडली आहे. दामू गणपती शिंदे या 45 वर्षीय शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात झाडाला गळफास घेवून जीवन संपवलं आहे.

दरम्यान, यंदा महाराष्ट्रातील मोठा भाग दुष्काळाने होरपळत आहे. विहीर, नदी, नाले, तलावांनी तळ गाठला आहे. अनेक भागांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा करावा लागत आहे.

VIDEO: 'नाणार'वर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले...

First published: March 4, 2019, 11:42 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading