मोटार पंप दुरुस्तीसाठी विहिरीत उतरलेल्या दोन शेतकऱ्यांचा गुदमरून मृत्यू

मोटार पंप दुरुस्तीसाठी विहिरीत उतरलेल्या दोन शेतकऱ्यांचा गुदमरून मृत्यू

दोघांचाही मृत्यु विहीरीतील विषारी वायूमूळे गूदमरून झाला असावा, असा अंदाज आहे. विहिरीची रुंदी जास्त नव्हती त्यामुळे मध्ये वायू तयार झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय.

  • Share this:

महेश तिवारी, गडचिरोली 11 ऑगस्ट :   शेतातील मोटार पंप नादुरुस्त असल्याने फूटबाल दुरूस्तीकरीता विहीरीत उतरलेल्या रोजंदारी मजूर व शेतमालकाचा विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाला. ही घटना आज सांयकाळी सहावाजेच्या सुमारास कुरखेडा तालुक्यातील आंधळी फाट्याजवळ असलेल्या शेतात घडली. प्रमोद निर्मलदास डहाळे (40) व रोजंदारी मजूर अजय जयराम मच्छीरके (25) रा. चिखली असे मृतकांचे नावे आहेत.

प्रमोद डहाळे यांचे आंधळी फाट्यावर शेती आहे. सांयकाळी शेतातील विहीरीत मोटार पंपाच्या फूटबालमध्ये बिघाड असल्याचं त्यांचा लक्षात आलं. त्याने शेतात काम करणारा अजय मच्छीरके याला विहीरीत उतरवलं. मात्र तो पाण्यात पडून बूडू लागल्यानं काठावर असलेला शेतमालक प्रमोद डहाळे याने बचावाकरीता शेजारील शेतकऱ्यांना हाक देत तोही विहीरीत उतरला. मात्र मदत मिळण्यापूर्वीच तो सूद्धा विहीरीच्या पाण्यात बुडाला. दोघांचाही मृत्यु विहीरीतील विषारी वायूमूळे गूदमरून झाला असावा, असा अंदाज आहे. विहिरीची रुंदी जास्त नव्हती त्यामुळे मध्ये वायू तयार झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय.

या महत्त्वाच्या ठिकाणी होऊ शकतो दहशती हल्ला, अलर्ट जारी

वर्ध्यात 83 लाखाचा दारुसाठा जप्त

जिल्ह्यात वाढत्या दारूच्या तक्रारीवरून पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी झाडाझडती घेतल्यानंतर सक्रिय झालेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वात मोठा  83 लाखाचा दारुसाठा जप्त केला आहे. कारंजा टोलनाक्यावरून संशयित ट्रेलरचालकाची तपासणी केली असता 63 लाखाच्या 1200 पेट्यासह असा एकूण 83 लाखाचा मुद्देमाल जप्त केलाय.

'मेट्रो'च्या कर्मचाऱ्याने Facebook Live करत केली आत्महत्या

वर्धा जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाला नागपूरच्या मार्गे दारू जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. यासाठी कारंजा येथील टोलनाक्यावर सपाळा रचण्यात आला होता. एका ट्रकची तपासणी केली असता ट्रेलरमध्ये भुसा असल्याचे सांगण्यात आले. पण यात चाकं दबलेली असल्याने नक्कीच वजनदार काही तरी असल्याच्या  संशयावरून गाडीची पाहणी करण्यात आली. यात उघडपणे भुसा दिसत होता. मात्र काही पोते हटवत पोलिसांनी पाहणी केली. यात दारूच्या पेट्या आढळून आल्यात. एक दोन नव्हे तर चक्क 1200 पेट्या विदेशी दारू असल्याने भुसा दाखवून वाहतूक केली जात होती.

VIDEO : अजित पवारांनी सांगितली पूरग्रस्त निष्पाप मुलाची व्यथा

यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाच्या हाती मोठा दारुसाठा हाती लागला. पण हा दारूचा माल हा हरियाणा एमपी आणि अरुणाचल प्रदेशमध्ये विक्रीसाठी जात होता. परंतु भुसा असल्याचे दाखवून अमरावतीच्या अलीकडे माल जात असल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या चौकशीत आठळले. नेमका माल कोणाच्या मालकीचा आहे आणि कुठून आला याचा शोध घेण्याचे आव्हान बाकी आहे. यात अटक करण्यात आलेल्या ट्रकचालक हा ट्रक नागरपूरपासून काही अंतरावर असणाऱ्या धाब्यावरून पुढे अमरावतीला नेणार होता. यासाठी त्याला पाच हजार रुपये मिळणार होते. पण कुठे हे सांगितले नसल्याने याचा शोध घेतला जाणार आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 11, 2019, 10:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading