उच्च दाबाच्या विद्युत वाहिणीला चिकटून दोन शेतकऱ्यांचा जागेवरच मृत्यू

उच्च दाबाच्या विद्युत वाहिणीला चिकटून दोन शेतकऱ्यांचा जागेवरच मृत्यू

आमदार गोगावले यांच्या समर्थकांनी गोंधळ केला आणि माजी आमदार जगताप यांच्या समर्थकांनी उठवला आवाज

  • Share this:

शैलेश पालकर,(प्रतिनिधी)

पोलादपूर,16 ऑक्टोबर: महाड औद्योगिक वसाहतीमधील संडोज कंपनीच्या समोरील मोकळ्या जागेत गुरांसाठी गवत कापणाऱ्या दोन शेतकऱ्यांचा उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीला चिकटून जागीच मृत्यू झाला. महावितरणच्या गलथान कारभारामुळे मनुष्यहानी होण्याची ही तिसरी घटना आहे. आतापर्यंत चार जण दगावले आहेत.

महाड औद्योगिक वसाहतीमधील संडोज कंपनीसमोर मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास की विद्युत वाहिनी तार तुटल्याने महावितरणला त्याची कल्पना देण्यात आली होती.संध्याकाळी महावितरणचे वायरमन घटनास्थळी येऊन पाहणी करून गेला. मात्र, त्यांनी ती तार जोडली नव्हती. बिरवाडीतील वेरखोल येथील रामचंद्र तांबे आणि महादेव पवार हे दोघे नेहमीप्रमाणे गुरांसाठी ओला चारा आणण्यासाठी सकाळी गेले असता त्यांचा उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीला स्पर्श झाला. दोघांचा जागेवरच मृत्यू झाला.

या दोन मृतदेहांपैकी एकाच्या हाताच्या मुठीमध्ये घट्ट पकडलेल्या गवताचे पुंजके दिसून आले. दुसरा मृतदेह त्यालगतच दिसून आला. हे दोन्ही मृतदेह उच्च दाबाच्या विद्युत प्रवाहामुळे काळे ठिक्कर पडले होते. घटनास्थळी विद्यमान आमदार भरत गोगावले हे पोहोचले असता मृतदेह पोलीसांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. मात्र, महावितरणच्या या अनागोंदी कारभारामुळे दोघांचे जीव हकनाक गेल्याने फार मोठा जनक्षोभ उसळला होता.

महावितरणला कल्पना देऊनही तुटलेली उच्च दाबाची विद्युत वाहक तार पूर्ववत न बसविल्याने हे दोघे मयत झाल्याचा जाब विचारण्यासाठी माजी आमदार व आघाडीचे उमेदवार माणिक जगताप हे घटनास्थळी गेले असता ते मते मागायला आल्याचा समज करून विद्यमान आमदार गोगावले यांच्या समर्थकांनी गोंधळ केला आणि माजी आमदार जगताप यांच्या समर्थकांनी देखील आवाज उठवला. यामुळे फारच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. महाडचे उपविभागीय पोलिस अधिक्षक मधुकर पाटील यांनी तातडीने दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांना समजावीत मागे केले. यावेळी माजी आमदार जगताप यांनी महावितरणचे एक्झिक्यूटिव्ह इंजिनियर खांडेकर यांना महाड पोलादपूर तालुक्यामध्ये जबाबदार अधिकारी नसल्याची गेल्या सहा महिन्याची वस्तुस्थिती असल्याचे तसेच दोन्ही मयत यांच्या मृत्यूचे कारण उच्च दाबाच्या तुटलेल्या विद्युत वाहिनीला स्पर्श हेच असल्याचे कबूल करून घेतले. यावेळी विद्यमान आमदार गोगावले आणि त्यांच्या समर्थकांनी तो काय बोलतोय रे? मतं मागतोय का? मते मागतोय? अशी विचारणा करत घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला. यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र डीवायएसपी पाटील आणि पोलिसांनी स्थितीवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळवले तसेच दोघांचे मृतदेह रुग्णवाहिकेतून महाड ग्रामीण रुग्णालयाकडे रवाना केले.

VIDEO:मास्तर बापाला शाळेत कधी बोलवायचे? अमोल कोल्हेंचा मुख्यमंत्र्यांचा टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 16, 2019 07:05 PM IST

ताज्या बातम्या