Home /News /maharashtra /

5 खून, जाळपोळ आणि बरेच गुन्हे, 12 लाखांचं बक्षीस असलेल्या दोन खतरनाक नक्षलवाद्यांचं अखेर आत्मसमर्पण

5 खून, जाळपोळ आणि बरेच गुन्हे, 12 लाखांचं बक्षीस असलेल्या दोन खतरनाक नक्षलवाद्यांचं अखेर आत्मसमर्पण

गडचिरोलीत 12 लाख रुपये बक्षीस असलेल्या दोन जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे.

    महेश तिवारी, प्रतिनिधी गडचिरोली, 25 मे : गडचिरोली जिल्ह्यातून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गडचिरोलीत 12 लाख रुपये बक्षीस असलेल्या दोन जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे. रामसिंग ऊर्फ सिताराम बक्का आत्राम, आणि माधुरी ऊर्फ भुरी ऊर्फ सुमन राजू मट्टामी अशी या दोन जहाल माओवाद्यांची नावे आहेत. त्यांनी आज पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या समोर आत्मसमर्पण केले आहे. रामसिंग ऊर्फ सिताराम बक्का आत्राम हा 2012 ते मार्च 2022 पर्यंत भामरागड एरीया टेक्नीकल दलममध्ये एसीएम पदावर कार्यरत होता. रामसिंगवर 1 खून, 1 चकमक आणि इतर 1 असे एकूण 3 गुन्हे दाखल आहेत. रामसिंग हा मौजा कासमपल्ली, गुंडुरवाही, हीकेर, आशा-नैनगुडा, आलदंडी येथील चकमकीत सहभागी होता. (काँग्रेसचा 'हात' सोडून कपिल सिब्बल यांची 'सायकल'स्वारी; सपाच्या मदतीने करणार राज्यसभेची वारी) माधुरी ऊर्फ भुरी ऊर्फ सुमन राजु मट्टामी ही फेब्रुवारी 2013 ते एप्रिल 2022 पर्यंत पेरमिली दलामध्ये एसीएम पदावर कार्यरत होती. माधुरीवर 4 खून, 21 चकमक, 7 जाळपोळ आणि इतर 5 असे एकूण 37 गुन्हे दाखल आहेत. ती मौजा वेळमागड, कसनासुर व माडवेली चकमकीमध्ये सहभागी होती. महाराष्ट्र शासनाने रामसिंग ऊर्फ सिताराम आत्राम याच्यावर 6 लाख रुपयांचं तर माधुरी ऊर्फ भुरी ऊर्फ सुमन मट्टामीवर 6 लाख रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते. या दोघांच्या आत्मसमर्पणाने माओवादी चळवळीला हादरा बसला आहे.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या