मुंबई, 6 जुलै- मुंबईत मरिन ड्राईव्हवर 2 जण बुडाल्याचे घटना घडली आहे. मरिन ड्राईव्हवर उंच लाटा उसळल्या आहेत. लाटांची आनंद घेण्यासाठी गेलेल्या दोघांना लाटांनी समुद्रात ओढल्याचे सांगितले जात आहे. दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. नेव्ही आणि अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरू आहे. समुद्रात बुडालेल्या दोघांपैकी एकाचा मृतदेह सापडला आहे. जावेद खान (वय-22) अशी मृत तरूनाची ओळख पटली आहे. बुडालेल्या दूसऱ्या तरुणाचा शोध नौदलाचे पानबुडे घेत आहेत.
समुद्रात उंच लाटा उसळल्यामुळे बचाव कार्यात अनेक अडचणी येत आहेत. बचाव कार्यातील एक पोलीस कॉन्स्टेबल जखमी झाला आहे. दुपारी अडीचच्या सुमारास मोठी भरती होती. त्या वेळी एक जण लाटेबरोबर वाहून गेला. त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्याने धाव घेतली. दोघेही भरतीच्या लाटांमध्ये वाहून गेले बुडालेल्यांमध्ये एका आठ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. तो बुडत असताना त्याला वाचवायला गेलेला एक तरुण देखील बुडाल्याची माहिती मिळाली आहे.
Mumbai: Rescue operation underway at Marine Drive for two people who have drowned here. pic.twitter.com/aqGMG03LKb
मुंबईमध्ये थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. आज पहाटेपासूनच मुंबई आणि उपनगरांतही मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. काल पावसानं थोडी उसंत घेतली होती. पण, सकाळपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी मुसळधार पाऊस होणार असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
ठाणे, डेंबिवलीतही पावसानं हजेरी लावली आहे. दिवा, कल्याण आणि ग्रामीण भागात रात्रीपासूनच पाऊस पडत असूनच मध्येच जोरदार पाऊस तर मध्येच हलक्या सरी पडत आहेत. त्यामुळे आज दिवसभरात मुंबई शहर आणि उपनगरात अधून मधून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या पश्चिम उपनगरात पाऊस जोरदार कोसळतो आहे.
आपल्या शहरातील पावसाचा अंदाज घेत मुंबईकरांनी घराबाहेर पडा असा सल्ला देण्यात आला आहे. तर पावसामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याचीही शक्यताही वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, सुट्टीचा दिवस असल्यामुळे लोक फिरायला जाण्याचं प्लानिंग करतात. अशा वेळी काळजी घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गेले 3 दिवस जोरदार पाऊस झाला. पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे 7 जुलैपर्यंत देशातल्या अनेक राज्यांत मुसळधार पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
पुढच्या 24 तासांत मध्य प्रदेश आणि विदर्भामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो. हवामानाची स्थिती मान्सूनसाठी अनुकूल आहे आणि त्यामुळे मान्सून वेगाने पुढे जाऊ शकतो. राजधानी दिल्लीमध्ये मात्र अजूनही उष्णतेच्या झळा कायम आहेत. इथे सगळेजण पावसाची वाट पाहत आहेत.
मुंबईमध्ये पावसाचा अलर्ट
मुंबईमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. 2005 नंतर मुंबईत 24 तासात एवढा मुसळधार सोमवार आणि मंगळवारी झाला. आजही काही भागात पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
उत्तराखंड, छत्तीसगड, दक्षिण गुजरात, कर्नाटकची किनारपट्टी, केरळ, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, तेलंगणा या राज्यांत जोरदार पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
6 जुलै : भारताच्या अनेक राज्यांत चांगला पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
7 जुलै : कोकण, गोवा, कर्नाटकची किनारपट्टी या भागांसोबतच ईशान्य भारत, मध्य प्रदेश, ओडिशा या राज्यांतही चांगला पाऊस होऊ शकतो.
दरम्यान, अर्थसंकल्पानं निराश केल्यानंतर आणि मध्य रेल्वेच्या खोळंब्यामुळे वैतागलेल्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. 15 ऑगस्टला मध्य रेल्वे एक मोबाईल अॅप लाँच करणार आहे. या मोबाईल अॅपमुळे रोजची ट्रेन कुठे आली, उशिरा धावतेय का? ट्रेन रद्द झाली का अशी सगळी माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. जीपीएस प्रणालीवर आधारित असं हे मोबाईल अॅप असेल. त्यामुळे अॅपवरील अपडेटनुसार तुम्ही घरबसल्या तुम्हाचा प्रवास प्लान करू शकाल.
SPECIAL REPORT: आरोपी खेकड्यांना खरंच पोलीस तुरुंगात डांबणार की काय?