चंद्रपुरातून आली धक्कादायक बातमी, क्वारंटाइन सेंटरमधील 7 दिवस आणि दोघांचा एकाच दिवशी मृत्यू

चंद्रपुरातून आली धक्कादायक बातमी, क्वारंटाइन सेंटरमधील 7 दिवस आणि दोघांचा एकाच दिवशी मृत्यू

क्वारंटाइन सेंटरमध्ये एकाच दिवशी दोन जणांच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे.

  • Share this:

हैदर शेख, प्रतिनिधी

चंद्रपूर, 30 मे : चंद्रपूर शहरातील शासकीय अभियांत्रिक महाविद्यालयात क्वारंटाइन केंद्रात दोन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आत्महत्या केली तर दुसऱ्या व्यक्तीचा प्रकृती अस्वास्थामुळे आकस्मिक मृत्यू झाला आहे.

चंद्रपूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शहरातील शासकीय अभियांत्रिक महाविद्यालयात क्वारंटाइन सेंटर सुरू करण्यात आले आहे.  या क्वारंटाइन सेंटरमध्ये आज सकाळी 7 दिवसांपूर्वी नागपूरहून आलेल्या एका मजुराने खोलीतच पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.  श्याम नगर भगतसिंग चौक येथील रहिवासी असणाऱ्या 30 वर्षीय युवकाने सकाळी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतीगृहातील क्वारंटाइन कक्षात 7.30 च्या सुमारास आत्महत्या केली. हा युवक नागपूर येथून आल्यानंतर क्वारंटाइन करण्यात आलं होतं.

हेही वाचा-दरवर्षी पृथ्वीवर धडकतात 17 हजार उल्का, या भागात सर्वाधिक धोका

दुसऱ्या घटनेत अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या निवासी कक्षामध्ये ( शासकीय निवासस्थान ) आपल्या कुटुंबासह अलगीकरणात असणार्‍या 40 वर्षीय नागरिकाचा प्रकृती अस्वास्थामुळे आकस्मिक मृत्यू झाला. मूळचे यवतमाळ जिल्हयातील वणी तालुक्यातील शिरपूर गावाचे आहे. त्यांचे कुटुंब त्यांच्यासोबत यावेळी होते. त्यांची प्रकृती स्थिर होती.

कुटुंबासोबत त्यांचा सकाळी संवादही झाला. सकाळी साडेसातला ते आराम करत होते. झोपेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या दोन्ही मृतकांचे कोरोना स्वॅब देखील घेण्यात येणार आहेत. या दोन्हीही रुग्णांची प्रकृती स्थिर होती. दोन्हीही रुग्ण शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वेगवेगळ्या इमारतीमध्ये अलगीकरणात होते.

हेही वाचा-सोन्याचे भाव उतरले तर चांदी 530 रुपयांनी वधारली, वाचा काय आहेत दर

क्वारंटाइन सेंटरमध्ये एकाच दिवशी दोन जणांच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे.  जिल्हाधिकारी  आणि वरिष्ठ आरोग्य यंत्रणा अधिकारी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तर मजुराच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: May 30, 2020, 12:12 PM IST

ताज्या बातम्या