विहीर दुरुस्तीचे काम सुरु असताना कमकुवत बांधकाम कोसळले, ढिगाऱ्याखाली दबून दोघांचा मृत्यू

विहीर दुरुस्तीचे काम सुरु असताना कमकुवत बांधकाम कोसळले,  ढिगाऱ्याखाली दबून दोघांचा मृत्यू

रवी तलवारे हा तरुण विहीर बांधण्याचे छोटे-मोठे काम करत होता तर कुंडलिक धाये हे शेतकरी होते. दोघे विहिरीचे काम पाहण्यासाठी आले होते. त्याचवेळी कमकुवत झालेले बांधकाम विहिरीत कोसळले. त्याखाली हे दोघेही दबले गेले.

  • Share this:

किशोर गोमाशे (प्रतिनिधी),

वाशिम, 24 एप्रिल- जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील मसला येथे विहीर दुरुस्तीचे काम सुरू असताना ढिगारा खचून त्याखाली दबून दोघांचा मृत्यु झाल्याची घटना समोर आली आहे. रवी तलवारे (वय-38) व कुंडलिक धाये (वय-65) अशी मृतांची नावे आहेत. दोघे विहिरीचे काम पाहण्यासाठी उभे होते.

मिळालेली माहिती अशी की, सुधीर थोरात यांची विहिर गट क्र.29 मध्ये आहे. विहिरीच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना विहिरीच्या एका बाजूचा भाग घसरला. काम कसे सुरू आहे हे पाहण्यासाठी उभे असलेले रवी तलवारे व कुंडलिक धाये हे दोघेही ढिगाऱ्याखाली दबले गेले.

रवी तलवारे हा तरुण विहीर बांधण्याचे छोटे-मोठे काम करत होता तर कुंडलिक धाये हे शेतकरी होते. दोघे विहिरीचे काम पाहण्यासाठी आले होते. त्याचवेळी कमकुवत झालेले बांधकाम विहिरीत कोसळले. त्याखाली हे दोघेही दबले गेले. मलबा हटविण्यासाठी कारंजाच्या सर्वधर्म आपत्कालीन संस्थेचे श्याम सवाई व तहसीलदार रणजित भोसले यांनी मदत केली. ढिगाऱ्याखाली दबून दोघांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

VIDEO : गौरीचं नाव घेतो पुन्हा येणार राष्ट्रवादी सरकार, नवरदेवाचा उखाणा व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 24, 2019 06:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading