भरधाव टाटा मॅजिक गाडी- ट्रेलरचा भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर

भरधाव टाटा मॅजिक गाडी- ट्रेलरचा भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर

भंडारा-पवनी मार्गावरील कोंडा गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. टाटा मॅजिक गाडी ट्रेलरवर आदळली असून या अपघाता दोघांचा जागीच मृत्यू झाला

  • Share this:

प्रवीण तांडेलकर,(प्रतिनिधी)

भंडारा,9 फेब्रुवारी: भंडारा-पवनी मार्गावरील कोंडा गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. टाटा मॅजिक गाडी ट्रेलरवर आदळली असून या अपघाता दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी आहे. जखमी व्यक्तीला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

ट्रॅक्टर नदीत कोसळला, 7 ऊसतोड मजूरांचा मृत्यू; अनेकांचे संसार उघड्यावर

दरम्यान, शनिवारी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवरील बेळगावजवळ ट्रॅक्टर नदीच्या पुलावरून कोसळून झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये महिलांचा समावेश आहे. या अपघातात 30 जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व ऊसतोड मजूर असल्याचे समजते. खानापूर तालुक्यातील बोगुर गावाजवळची ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातामुळे अनेक ऊसतोड कामगारांचे संसार उघड्यावर आले आहेत.

मिळालेली माहिती अशी की, चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रित सुटल्याने हा भीषण अपघात झाला. जखमी मजुरांवर तातडीने बेळगाव येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. ऊसतोड करणारे कामगार ट्रॅकटरमधून इटगी गावनजीकच्या बाहेरील रस्त्यावरून जात असताना हा अपघात झाला. ट्रॅक्टरचा पुलाच्या कठड्याला धडक बसून तो थेट नदीत कोसळला. यात चार जणांचा जागीच तर तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमीपैकी दहा जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व मयत बोगुर गावचे राहणारे आहेत. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली.

ही दुर्घटना नंदगडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. तंगव्वा हुंचेन्नत्ती, अशोक केदारी, शांतवा अल्गोडी, गुलाबी हुंचीकट्टी, नागाव्वा मातोळे, शांतव्वा बिझोरे, नीलव्वा मुत्नाळ अशी मृतांची नावे आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 9, 2020 03:29 PM IST

ताज्या बातम्या