उन्हाचा पारा चढला.. माढ्यात उष्माघाताने दोन वृद्धांचा मृत्यू

उन्हाचा पारा चढला.. माढ्यात उष्माघाताने दोन वृद्धांचा मृत्यू

संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट आली आहे. परिणामी माढा शहरातही उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतच आहे. वाढत्या उष्णतेचा परिणाम जनजीवनावर जाणवत आहे.

  • Share this:

माढा, 30 एप्रिल- संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट आली आहे. परिणामी माढा शहरातही उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतच आहे. वाढत्या उष्णतेचा परिणाम जनजीवनावर जाणवत आहे.

शहरात उष्माघाताने दोन वृद्धांचा मृत्यु झाला आहे. भानुदास तुकाराम भांगे (87) यांचा तसेच क्रांती नगरातील साठे गल्लीत राहणाऱ्या साखराबाई संदीपान बरडे ( 65) यांचा उष्माघाताने मृत्यु झाला. सलग दोन दिवसांत शहरातील दोन्ही वृद्धांचा बळी गेला आहे. माढा शहरवासियांनी तब्येतेची काळजी.. वेळीच डॉक्टराचा सल्ला घ्या..असे आवाहन प्रशासनाने दिले आहे.

माढ्यात तापमानाचा पारा 44.5 अंशावर पोहोचला आहे. उन्हाचा कडाका वाढल्याने शहरवासिय कमालीचे हैराण झालेत. संध्याकाळी आठ वाजेपर्यंत उन्हाच्या झळा जाणवत आहेत. उन्हाच्या झळांपासून बचाव करण्यासाठी शहरातील बाजारपेठेतील इलेक्ट्रॉनिक्स दुकानात कूलर खरेदीसाठी झुबड उडत आहे. मागील चार दिवसांपासून उन्हाचा पारा वाढल्याने कूलर, फॅनची मागणी दुप्पट वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

3 दिवसांत 12 जणांचा मृत्यू

देशासह राज्यात सध्या उन्हाच्या झळांनी जीव नकोसा झाला आहे. पण, हा उन्हाळा जीवघेणा ठरत असल्याचं आता आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे. कारण, नागपूरमध्ये मागील तीन दिवसात 12 जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. तर हिंगोली जिल्ह्यामध्ये 2 आणि अकोल्यात एकाचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. विदर्भात देखील सध्या तापमान दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. राज्यातील अनेक शहरांमधील तापमान हे 40 डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेलं आहे. लोकांच्या अंगावर घामाच्या धारा लागल्याचं चित्र देखील सध्या पाहायाला मिळत आहे. हवामान खात्यानं उन्हाचा हा तडाखा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

अकोल्यात 46. 1 डिग्री सेल्सिअस, अमरावतीमध्ये 46.8 डिग्री सेल्सिअस, चंद्रपुरात डिग्री सेल्सिअस 46.6, वर्धामध्ये 45.8 आणि नागपूरमध्ये 44.8 डिग्री सेल्सिअसवर पारा गेला आहे. सध्या वाढत्या उन्हाच्या झळा पाहता लोक घराबाहेर पडणं देखील टाळत आहे.

मराठवाडा आणि विदर्भातील पाण्याचं भीषण वास्तव दाखवणारा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 30, 2019 03:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading