मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

गोवा फिरुन आले, अंधेरी अवघ्या काही अंतरावर, आणि अनपेक्षित दुर्घटना, नेमकं काय झालं?

गोवा फिरुन आले, अंधेरी अवघ्या काही अंतरावर, आणि अनपेक्षित दुर्घटना, नेमकं काय झालं?

पुणे-मुंबई महामार्गावर पुन्हा भीषण अपघात

पुणे-मुंबई महामार्गावर पुन्हा भीषण अपघात

शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर आणखी एका भयानक अपघाताने खळबळ उडाली आहे.

    प्रमोद पाटील, नवी मुंबई, 17 ऑगस्ट : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर आणखी एका भयानक अपघाताने खळबळ उडाली आहे. पुणे-मुंबई लेन एक्सप्रेस वेवर कळंबोली ब्रिजवर एक भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अपघाती क्वीड कार चक्काचूर झाली. अतिशय भयानक ही घटना होती. या दुर्घटनेत कारचालक जखमी झाला आहे. संबंधित घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. पुणे-मुंबई लेन एक्सप्रेस वेवर कळंबोली ब्रिजवर भरधाव कारवरील चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक दिली. या अपघातात कारमधील दोघा जणांचा मृत्यू झाला तर कारचालक जखमी झाला आहे. संबंधित घटनेची माहिती मिळताच आरोग्य यंत्रणा आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेत गाडीतील दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. तर कारचालक जखमी झाला. संबंधित घटनेची दखल घेत पोलिसांनी कारचालकाविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (विनायक मेटेंच्या चालकाबद्दल धक्कादायक माहिती समोर, मेटेंच्या भाच्याने पत्रकार परिषद घेऊन केला खुलासा) या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेले दोन्ही व्यक्ती हे मुंबईतील अंधेरी येथील रहिवासी होते. ते गोवा येथे फिरण्यासाठी गेले होते. तेथून ते परत येत असताना पुणे-मुंबई एक्सप्रेस वेने कारने घरी जात होते. यावेळी पुणे मुंबई लेन, एक्सप्रेस वेवर कळंबोली ब्रिजवर जयंत डांगे याचे कारवरील नियंत्रण सुटले. अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर होवून पूर्णपणे नुकसान झालं आहे.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: Accident, Mumbai

    पुढील बातम्या