मराठवाड्याच्या महत्त्वाचा जिल्हा होता कोरोनामुक्त, पण आता प्रशासनही हादरले

मराठवाड्याच्या महत्त्वाचा जिल्हा होता कोरोनामुक्त, पण आता प्रशासनही हादरले

मुंबई आणि पुण्याहून विना परवाना जिल्ह्यात आलेल्या गेवराई आणि माजलगाव मधील प्रत्येकी एका व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

  • Share this:

बीड, 17 मे : महाराष्ट्रापुढे कोरोना संकटाचे ढग दिवसेंदिवस आणखी गडद होत चालले आहे.  कोरोनावर मात करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. तर दुसरीकडे राज्यातील काही जिल्ह्यात कोरोना शिरकाव करू शकला नव्हता. परंतु, आता विना परवाना प्रवास करणाऱ्यांमुळे ग्रीन झोन असलेल्या बीडमध्ये कोरोनाने एंट्री केली आहे.

मुंबई आणि पुण्याहून विना परवाना जिल्ह्यात आलेल्या गेवराई आणि माजलगाव मधील प्रत्येकी एका व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे आता जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दोन वर गेली आहे.

हेही वाचा -'कुक्कुटपालन आणि साखर कारखाना', राणे-पवारांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक

जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. गेवराई येथील रुग्ण पुण्याहून तर माजलगाव येथील रुग्ण मुंबईहून विना परवानगी जिल्ह्यात दाखल झाल्याची माहिती आहे.

या दोन रुग्णांचे  स्वॅब नमुने पॉझिटिव्ह आल्याची पुष्टी बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी केली आहे. आता या दोघांच्याही संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाइन करण्याची कारवाई आरोग्य विभागाकडून सुरू झाली आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने  नागरिकांनी सतर्क राहण्याची सूचना केली असून विनाकारण बाहेर पडू नये असं आवाहन केलं आहे.

रत्नागिरीतही मुंबईतून परत आल्यामुळे कोरोनाचा शिरकाव

दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातही मुंबईतून परत आलेल्या लोकांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढल्याची धक्कादायक बाबसमोर आली आहे.  आज पुन्हा 4 कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने जिल्ह्याची संख्या 86 झाली आहे.

हेही वाचा -आपल्या महाराष्ट्रात पोहोचताच लेकीसमोर बापाने सोडला जीव, ग्रीन झोन जिल्हा हादरला

रत्नागिरी जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच कोरोना पॉझिटिव्ह रुगणांचा इतिहास मुंबईचा आहे. चाकरमानी मुंबईकर मोठ्या प्रमाणात कोकणात दाखल होत असल्याने  जिल्ह्यातील परिस्थिती हाता बाहेर जात आहे की काय अशी भीती व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सुद्धा चांगलीच हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्यात कोरोनाबाधितांची 30 हजार पार

दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 30 हजार 706 वर पोहोचलीआहे. 16 मे पर्यंत 1606 नविन रुग्णांचे निदान झाले असून काल दिवसभरात 524 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत राज्यभरात 7088 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या 22 हजार 479 रुग्णांवर उपचार सुरू, असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

संपादन - सचिन साळवे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 17, 2020 09:44 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading