मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

रात्री कुटुंब झोपलं, मध्यरात्री चारही मुलांना उलट्या, पहाटे रुग्णालयात नेताच दोघांचा मृत्यू, विरारमध्ये खळबळ

रात्री कुटुंब झोपलं, मध्यरात्री चारही मुलांना उलट्या, पहाटे रुग्णालयात नेताच दोघांचा मृत्यू, विरारमध्ये खळबळ

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

विरार पूर्वेकडील कणेर भोये पाडा येथे राहणाऱ्या एकाच कुटुंबातील दोन मुलांचा विषबाधेमुळे मृत्य झालाय. तर तीन मुलांना रुग्णालयात दाखल करून देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

  • Published by:  Chetan Patil
नालासोपारा, 13 ऑगस्ट : विरार पूर्वेकडील कणेर भोये पाडा येथे राहणाऱ्या एकाच कुटुंबातील दोन मुलांचा विषबाधेमुळे मृत्य झालाय. तर तीन मुलांना रुग्णालयात दाखल करून देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. विषबाधा नेमकी कशामुळे झाली हे शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर समजेल असे आमदार राजेश पाटील यांनी सांगितले आहे. पण या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. विरार पूर्वेकडील महामार्गावरील विरार फाटा येथील कणेरच्या भोये पाडा येथे शेख आडनाव असलेले उत्तर भारतीय कुटुंब आपल्या पाच मुलांसह राहत होते. ते नेहमी प्रमाणे 12 ऑगस्टच्या रात्री जेवण करून झोपी गेले होते. मात्र 13 ऑगस्टला मध्यरात्रीनंतर दोन मुलांना उलट्या सुरू झाल्या. एवढ्या रात्री दवाखान्यात जाण्यापेक्षा पहाटे लवकर जाऊ, असा विचार करून पालकांनी उलट्या करणाऱ्या मुलांवर घरगुती तात्पुरता उपचार केला होता. (रक्षाबंधनाला बहिणीला भेटवस्तू देण्यासाठी भावाचा मालकाच्या घरात डल्ला, नागपुरातील धक्कादायक घटना) तरीही काही फरक पडत नसल्याने त्यांनी भल्या पहाटे मुलांना दवाखान्यात नेण्यासाठी प्रवास सुरु केला होता. पण तोपर्यंत खूप उशिर झाला होता. एका मुलाचा दवाखान्यात पोहचताना मृत्यू झाला तर एक अगोदरच मृत्यमुखी पडला होता. आसिफ अश्फाक खान (वय 9 वर्ष), मुलगी फरीफ अश्फाक खान (वय 8 वर्ष) अशी मृतक भावंडांची नावे आहेत . संबंधित घटनेची माहिती मिळताच बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील यांनी मांडवी पोलीस आणि प्रा आ केंद्र भाताणेचे वैदयकीय अधिकारी डॉ सुषमा मुळीक आणि कृष्णकुमार यादव यांना माहिती दिली. त्यानंतर उर्वरीत तीन मुलांना वसई विरार महानगरपालिकेच्या तुळींज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती ठीक असली तरी त्यांना देखरेखीखाली ठेवले आहे. मुलांच्या आई-वडिलांना कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत. ते व्यवस्थित असल्याचे सांगण्यात आले आहे. ही विषबाधा नेमकी कशाने झाली हे समजू शकले नसून सर्प दंश किवा जेवणातून विषबाधा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
First published:

पुढील बातम्या