बीड, 8 जून- जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्री वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह जोरात पाऊस झाला. बीड, माजलगाव तालुक्यातील बहुतांश गावांना या वादळी पावसाचा फटका बसला. घरावरील पत्रे उडून त्यावरील दगड अंगावर पडल्याने अनेक जण जखमी झाले तर लोणी शहाजानपूर गावातील चारा छावणीत वीज पडून 2 बैल दगावल्याची माहिती मिळाली आहे.
गंगामसाला येथील नागरिकांनी घरातील पलंग-बाजाचा आधार घेतल्याने त्यांच थोडक्यात प्राण बचावले. सात हजार लोकसंख्या असलेल्या गंगामसला गावात हाहाकार उडाला. अनेक झाडे उन्मडून पडली. विजेचे खांब वाकून तारा तुटल्या. घरावरील पत्रे उडून गेले तर भिंती पडल्या. तसेच चारचाकी व दुचाकी या वाहनांचेही अवकाळी पावसात प्रचंड नुकसान झाले आहे.
शुक्रवारी अचानक वादळवाऱ्यासह, विजेचा कडकडाटसह जोरदार पाऊस झाला. गाव व गावाबाहेर असलेल्या वस्त्यांमध्ये हाहाकार उडाला. घरावरील पत्रे, पाण्याच्या टाक्या, सोलार, डिश आदींचे प्रचंड नुकसान झाले आहे. गावातील पशुवैद्यकीय दवाखाना, अंगणवाडी, प्राथमिक शाळा या वरील पत्रे उडून गेले. भिंती पडल्या. या गावात पत्रे उडाल्याने त्यावरील ठेवलेले दगड घरात नागरिकांच्या अंगावर पडल्याने कित्येक जण जखमी झाले आहेत. भाटवडगाव येथेही वादळाने गावातील शंभर पेक्षा जास्त घरावरील पत्रे उडाले आहेत. या घटनेत शेख मुन्नबी, शेख रूस्तुम, शेख सानिया, शेख महेमुदाबी, शेख नवाब, सकलादी भानुदास पटेकर, अरूण प्रदिप साळवे पाचजण जखमी झाले आहेत तर दोन शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. म्हशी, गाय, बैल जखमी झाले आहेत.
बाळासाहेब ठाकरेंकडे दैवी शक्ती: चंद्रकांत खैरेंचा पुन्हा अजब दावा