Home /News /maharashtra /

मृत्यूने क्षणात घेतली झडप, दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव

मृत्यूने क्षणात घेतली झडप, दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव

दोन चिमुरड्या सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

महाड, 30 सप्टेंबर : मृत्यू कधी आणि कसा झडप घालेल याचा काही नेमक नसतो, असं म्हणतात. याचीच प्रचिती महाडमध्ये आली आहे. भंगाराच्या गोडाऊन शेजारी उभ्या असलेल्या बंद होडा सिटी कारमध्ये गुदमरून दोन चिमुरड्या सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. नागंलवाडी फाट्यावर भंगार वाल्याने भंगारात विकत घेतलेल्या कारचे दरवाजे अ‍ॅटोलॉक झाल्यामुळे ही घटना घडली आहे. सुहेल खान वय वर्ष 6 आणि अब्बास खान वय वर्ष 4 अशी मृत मुलांची नावं आहेत. हे दोघे चिमुरडे संध्याकाळी खेळताना या गाडीत बसले असावे, असा अंदाज बांधण्यात येत आहे. दरम्यान गाडीचा दरवाजा बंद झाला आणि लहानग्यांना तो उघडता आला नाही. त्यामुळे गुदमरून दोघांनी आपला जीव गमावला, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी महाड ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आले असून महाड औद्योगिक वसाहत पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे लहान मुलांकडे पालकांनी लक्ष देण्याची किती आवश्यकता आहे, हे अधोरेखित झालं आहे. कारण चिमुरडी मुले खेळता-खेळता कुठे जातील, याचा अंदाज बांधणं कठीण. त्यातच एक दुर्घटना त्यांचं अख्खं आयुष्य हिरावून घेऊ शकते. त्यामुळे पालकांनी आपल्या लहानग्यांची काळजी घ्यावी, असं आवाहन कऱण्यात येत आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Raigad, महाड mahad

पुढील बातम्या