आई-वडिलांनी एका क्षणात गमावली 2 मुलं, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

आई-वडिलांनी एका क्षणात गमावली 2 मुलं, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

दोन भावांच्या मृत्यूनंतर सोनेगाव येथे शोककळा पसरली आहे.

  • Share this:

गोंदिया, 25 जून : गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील सोनेगांव येथील दोन भावांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृतकांचे नाव दिशांत मनोज गौतम वय 12 वर्ष, दीपक सुनिल गौतम वय 15 वर्ष आहे.

दिशांत गौतम व दिपक गौतम हे दोघे भाऊ सकाळी गावाशेजारी शेळ्या चारायला घेऊन गेले होते. मात्र काही वेळातच जवळ असलेल्या नाल्याच्या पाण्यात त्यांनी अंघोळ कराचे ठरवले व दोघांनीही या नाल्यात उडी घेतली. मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा याच ठिकाणी बुडून अंत झाला.

दोन्ही सख्ये भाऊ मृत्यूमुखी पडल्याने त्यांच्या आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर याची माहिती पोलिसांना देण्यात आली असताना पोलिसांनी स्पॉट पंचनामा करत दोन्ही मृत देह शवविच्छेदन करण्यासाठी तीरोडा येथील शासकीय रुग्णालयात नेले आहे. या दोन भावांच्या मृत्यूनंतर सोनेगाव येथे शोककळा पसरली आहे.

दरम्यान, जालन्यातही 23 जून रोजी अशीच एक दुर्दैवी घटना घडली होती. खेळता खेळता पाझर तलावात बुडून एकाच कुटुंबातील 5 मुलींचा मृत्यू झाला. भोकरदन तालुक्यातील तळेगाव वाडी येथे ही मंगळवारी सायंकाळी ही हृदयद्रावक घटना घडली. मृत पाचही मुली 5 ते 7 वयोगटातील होत्या. या घटनेमुळे तळेगाव वाडी गावावर शोककळा पसरली.

भोकरदन तालुक्यातील तळेगाव वाडी या गावातील मुली पाझर तलावाजवळ खेळत होत्या. दरम्यान 5 मुलींचा या पाझर तलावात बुडून करुण अंत झाला. आशुबी पठाण-6 वर्षे, नबीबाबी पठाण-6 वर्षे, अल्फीदाबी पठाण-7 वर्षे, सानियाबी पठाण-6 वर्षे आणि शब्बुबी पठाण-5 वर्षे अशी मृत मुलींची नावं आहेत. या मुली खेळताना पाझर तलावात पडल्या असाव्यात किंवा पोहताना बुडाल्या असाव्यात, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

First published: June 25, 2020, 5:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading