धरणात बुडून दोन भावांचा करुण अंत; परभणी जिल्ह्यात घडली घटना

धरणात बुडून दोन भावांचा करुण अंत; परभणी जिल्ह्यात घडली घटना

धरणावर पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा धरणाच्या पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला.

  • Share this:

परभणी, 1 जून : जिंतूर तालुक्यात पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तालुक्यातील वझर गावामध्ये आज सकाळी धरणावर पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा धरणाच्या पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला असून या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

वझर गावाच्या सीमेवर असलेल्या धरणांमध्ये गावात राहणाऱ्या 18 वर्षीय ओम पजई आणि 16 वर्षीय महेश पजई हे दोन युवक सकाळी पोहण्यासाठी गेले होते. परंतु अचानक हे दोघेही पाण्यात बुडू लागले. त्यातच त्यांचा अंत झाला.

घटनेची माहिती मिळताच गावातील लोकांनी त्यांना पाण्याच्या बाहेर काढलं आणि त्यांच्या शरीरात गेलेलं पाणी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला. परंतु कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचं पाहिल्यावर त्यांना गावातील शासकीय रुग्णल्यात हलवण्यात आले. त्या ठिकाणी वैद्यकीय स्टाप नसल्याने शेवटी जिंतूर येथील शासकीय रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. मात्र तिथं डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

हेही वाचा - पुणेकर जावयाच्या संपर्कात आल्यानंतर पंढरपूरमध्ये सासऱ्यालाही कोरोनाची लागण

दरम्यान, कुटुंबातील दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने पजई कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मुलांच्या निधनाचं वृत्त समताच पजई कुटुंबाने मोठा आक्रोश केला. या दुर्दैवी घटनेनंतर वझर गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेप्रकरणी पोलीस तपास सुरू करण्यात आला आहे.

संपादन - अक्षय शितोळे

Tags: parbhani
First Published: Jun 1, 2020 05:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading