मृत मुले पुन्हा जिवंत होतील, या आशेने जिल्हा रुग्णालयात मिठात ठेवले मृतदेह 

मृत मुले पुन्हा जिवंत होतील, या आशेने जिल्हा रुग्णालयात मिठात ठेवले मृतदेह 

मृत मुले पुन्हा जिवंत होतील, या आशेने जिल्हा रुग्णालयात त्यांचे मृतदेह मिठात ठेवल्याची माहिती समोर आली आहे. नातेवाईकांच्या मागणीनुसार जिल्हा रुग्णालयाच्या शवगृहात मृत मुलांचे मृतदेह मिठात ठेवण्यात आल्याने तर्कवितर्क मांडले जात आहेत.

  • Share this:

राजेश भागवत (प्रतिनिधी)

जळगाव, 17 ऑगस्ट- शहरातील मेहरूण तलाव परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या दोन सख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (16 ऑगस्ट) सायंकाळी घडली होती. मात्र, मृत मुले पुन्हा जिवंत होतील, या आशेने जिल्हा रुग्णालयात त्यांचे मृतदेह मिठात ठेवल्याची माहिती समोर आली आहे. नातेवाईकांच्या मागणीनुसार जिल्हा रुग्णालयाच्या शवगृहात मृत मुलांचे मृतदेह मिठात ठेवण्यात आल्याने तर्कवितर्क मांडले जात आहेत. सोशल मीडियातही मिठात ठेवलेल्या मृतदेहाचे फोटा व्हायरल होत आहेत.

काय आहे हे प्रकरण?

जळगाव शहरातील अक्सा नगर परिसरात राहणाऱ्या जॅकी अहमद यांची तीन मुले आणि त्यांचा भाऊ हे सर्वजण शु्क्रवारी सायंकाळी मेहरूण तलाव परिसरात फिरण्यासाठी गेले होते. तलाव पाहणी करीत असताना आणलेल्या दुचाकीला पाण्यात उतरवून धुण्याचा प्रयत्न करीत असताना उमर अहमद या 16 वर्षीय बालकाचा पाय घसरुन तो पाण्यात बुडायला लागला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नांत अन्य दोघेही बुडू लागली होती. मात्र, बाजूलाच असलेल्या काहींना ही घटना लक्षात येताच त्यांनी तिघांना काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना एकालाच वाचविण्यात यश आले. उर्वरित दोघांचा मृत्यू झाला. त्यांना पाण्यातून काढल्यानंतर तातडीने जळगावच्या वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. नंतर दोघांचे मृतदेह शवगृहात हलवण्यात आले.

जाड मिठात ठेवण्याचा प्रयोग...

दरम्यान, मृत मुले पुन्हा जिवंत होतील, या आशेने त्यांच्या नातेवाईकांच्या मागणीनुसार दोन्ही मृतदेह मिठात ठेवण्याचा प्रयोग करण्यात आला. एरव्ही जिल्हा रुग्णालयात शवगृहात मृतदेह सुरक्षित ठेवण्यासाठी बर्फाचा वापर केला जातो. मात्र, मृतदेह मिठात ठेवण्यात आल्याने शहरात चर्चेचा विषय बनला आहे. आपल्या मित्रांना वाचविण्यासाठी त्याच्या मित्रांनी शेवटची आशा म्हणून अशा प्रकारचा प्रयोग तोही थेट शवगृहात केल्याने उलटसुलट चर्चाही सुरू झाल्या आहेत.

वैद्यकीय अधिकऱ्याचे कानावर हात..

डॉ. मिना दामोदरे यांनी सांगितले की, मृतांच्या नातेवाईकांनीच मृतदेह मिठात ठेवले होते. मिठात मृतदेह अधिककाळ चांगले राहू शकते. मात्र, मृत व्यक्ती पुन्हा जिवंत होण्याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. मृतदेहांचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

डॉन आहे का तू? पोलिसांनी तरुणाला पट्ट्याने झोड-झोडपलं, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 17, 2019 08:24 PM IST

ताज्या बातम्या