मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिकार केलेल्या काळविटाचं मटण खाणं पडलं महागात; काय आहे नेमकं प्रकरण?

शिकार केलेल्या काळविटाचं मटण खाणं पडलं महागात; काय आहे नेमकं प्रकरण?

सोलापुरात काळवीटाची शिकार करणाऱ्या शिकाऱ्याकडून मटन विकत घेणे दोघांना चांगलेच महागात पडलं आहे.

सोलापुरात काळवीटाची शिकार करणाऱ्या शिकाऱ्याकडून मटन विकत घेणे दोघांना चांगलेच महागात पडलं आहे.

सोलापुरात काळवीटाची शिकार करणाऱ्या शिकाऱ्याकडून मटन विकत घेणे दोघांना चांगलेच महागात पडलं आहे.

सोलापूर, 1 सप्टेंबर: सोलापुरात काळविटाची शिकार करणाऱ्या शिकाऱ्याकडून मटण विकत घेणे दोघांना चांगलेच महागात पडलं आहे. आता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी दोघांना अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वन अधिनियमानुसार शिकार करणे किंवा त्याचे मटण खरेदी करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे शिकाऱ्याकडून मटण घेणाऱ्यांना वनविभागाने अटक करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुतन्ना कोळी आणि विष्णू बनसोडे अशी आरोपींची नावं आहेत. हेही वाचा...महापुरानं घेतला दाम्प्त्याचा जीव, आई-वडिलांचं छत्र हरपल्यानं अनाथ झाली 5 मुलं यापूर्वी शिकार केल्याप्रकरणी अनेक शिकाऱ्यांवर कारवाई झाली होती. मात्र, मटण विकत घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल होण्याची महाराष्ट्रातील वन विभागाची ही पहिलीच कारवाई असल्याचं बोललं जात आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील संगदरी गावात तीन दिवसांपूर्वी आरोपी विजय भोसले या शिकाऱ्याला वनविभागाने काळविटाच्या मटणासह रंगेहाथ अटक केली होती. यावेळी आरोपीच्या घरात काळविटचं मांस, चारही पायाचे खूरं, कातड्याचे तुकडे, शिंगे, नायलॉन वायरचे फासे, कुऱ्हाड, सुरा, वागर, वजन काटा असं साहित्या जप्त करण्यात आलं होतं. त्यानंतर वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी इरशाद शेख यांनी अतिशय शिताफीने आरोपीचे कॉल रेकॉर्ड चेक करुन त्याच्याकडून ज्या व्यक्तींनी काळविटाचं मटण नेले, त्यांचा तपास केला. या तपासात दोन आरोपींचे कॉल रेकॉर्डिंग अधिकाऱ्यांना मिळाले. त्यानुसार मुतन्ना कोळी आणि विष्णू बनसोडे या आरोपींना अटक करण्यात आली. अटकेनंतर दोघांना कोर्टात हजर केलं असता न्यायलयानं त्यांना 3 सप्टेंबरपर्यंत वन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान या घटनेनंतर आणखी कोणी यामध्ये सामील आहे का. याचा देखील तपास वनविभागाचे अधिकारी करत आहेत. दरम्यान, सोलापुरातील नेचर कॉन्झर्वेशन सर्कलला आलेल्या गोपनिय माहितीच्या आधारे नेचर कॉन्झर्वेशन सर्कल सोलापूर, जिल्हा पोलीस दल आणि वन विभाग सोलापूर यांच्या संयुक्त कारवाईतून हे काळवीट शिकार प्रकरण उघडकीस आलं आहे. संगदरी येथे काळवीटची शिकार करून त्याचे मांस विक्री होत असल्याची माहिती नेचर कॉन्झर्वेशन सर्कलला मिळाली. हेही वाचा...प्रकाश आंबेडकरांच्या आंदोलनानंतर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीनं घेतला मोठा निर्णय माहिती मिळताच त्यांनी पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून सदर घडलेल्या घटनेची माहिती दिली. पोलिस अधिक्षकांनी तात्काळ पोलिसांचे एक पथक नेचर कॉन्झर्वेशन सर्कल सोबत पाठवले. तसेच वन विभागाच्या काही कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळी धाड टाकली असता काळविटाची शिकार झाल्याचे उघड झाले.
First published:

Tags: Solapur, Solapur news

पुढील बातम्या