दहावीत शिकणाऱ्या दोन मित्रांचा नाल्यात बुडून मृत्यू; गावात पसरली शोककळा

दहावीत शिकणाऱ्या दोन मित्रांचा नाल्यात बुडून मृत्यू; गावात पसरली शोककळा

भावेश आणि हितेश हे दोन्ही मित्र गेले होते 15 फूट खोल पाण्यात...

  • Share this:

जळगाव, 1 ऑगस्ट: अमळनेर तालुक्यात पोहोण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा नाल्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वाघोदे शिवारात शनिवारी ही दुर्घटना घडली असून लोंढवे गावात शोककळा पसरली आहे.

वाघोदे शिवारामध्ये नाल्यात पोहोण्यासाठी गेलेल्या लोंढवे येथील दहावीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थी मित्रांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी साडेअकरा वाजता घडली.

हेही वाचा...स्टुडिओ मालकाच्या छळाला कंटाळून फोटोग्राफरची आत्महत्या, संतप्त नातेवाईकांचा स्टुडिओत राडा

भावेश बळीराम देसले (वय-15), हितेश सुनील पवार (वय-15) आणि जयवंत सुरेश पाटील हे तिघे मित्र जवळच असलेल्या नाल्यात पोहोण्यासाठी गेले होते. पावसामुळे हा नाला तुडूंब भरून वाहत आहे. भावेश आणि हितेश हे दोन्ही 15 फूट खोल पाण्यात गेले आणि काही वेळातच ते बुडू लागले. दोन्ही मित्र बुडत असल्याचे पाहून जयंवत हा गलितगात्र झाला. त्याने दोघांना वाचवण्यासाठी आरडाओरड केली. परंतु जवळ कोणीच नसल्याने मदतीला कोणीही आले नाही. यानंतर त्याने गावात धाव घेऊन दोघे मित्र पाण्यात बुडल्याची माहिती दिली. लगेच भावेश, हितेश यांच्या कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यातील पट्टीच्या पोहोणाऱ्यांनी पटापट नाल्यात उड्या टाकून दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढले. या घटनेनं गाव सुन्न झालं आहे.

हेही वाचा...भाजपचं दूध आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा, शिवसेना नेत्याचा पलटवार

भावेश आणि हितेश शेतकऱ्यांची मुले...

भावेश आणि हितेश ही दोन्ही मुले सामान्य शेतकरी कुटुंबातील होती. भावेश आणि हितेश यांचा मृतदेह अमळनेर ग्रामीण रुग्णालयात आणून शवच्छदेन करण्यात आले. या घटनेमुळे लोंढवे गावावर शोककळा पसरली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: August 1, 2020, 7:56 PM IST

ताज्या बातम्या