तुमसर, 12 सप्टेंबर : पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर अवघ्या काही तासांनंतर पतीनेही जीव सोडल्याची घटना तुमसर इथं घडली आहे. दयाबाई चौरे (वय 58) असं मृत पत्नीचं नाव असून रमेश चौरे (वय 66) असं पतीचं नाव आहे. पती-पत्नीच्या मृत्यूमुळे त्यांच्या 1 मुलगा आणि 2 मुलींच्या डोक्यावरील मायेचं छत्र हरपलं आहे.
तुमसर येथील रविदास नगर इथं राहणारे चौरे पती-पत्नी आपल्या मुलांसह सुखात संसार करत होते. मात्र गुरुवारची संध्याकाळ या कुटुंबासासाठी दु:खाचा डोंगर घेवून आली अन् अवघ्या काही तासांत संपूर्ण कुटुंब उद्धवस्त झालं.
दयाबाई चौरे यांचं 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता ह्रदयविकाराच्या झटकाने निधन झालं. पत्नीच्या निधनाने जगण्याची उमेद गमावणाऱ्या रमेश चौरे यांनीही अवघ्या 2 तासांतच जगाचा निरोप घेतला. या दोघांवरही रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.
हेही वाचा - एकूलत्या एका लेकराचीही अज्ञातांनी केली निर्घृण हत्या, भिवंडीमध्ये धक्कादायक प्रकार
आई आणि वडिलांचा मृत्यू झाल्याने एका क्षणांत 3 चिमुकली पोरकी झाली. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.