मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पीएमपीएमएल'चा तुका'राम'राम, वर्षभरातच तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली

पीएमपीएमएल'चा तुका'राम'राम, वर्षभरातच तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली

 कर्मचाऱ्यांचा ओव्हरटाईम बंद, भाडेतत्वारील बसेस बंद पडल्यास कंत्राटदाराला 5 हजार रूपयांचा दंड असे अनेक निर्णय त्यांनी घेतले होते.

कर्मचाऱ्यांचा ओव्हरटाईम बंद, भाडेतत्वारील बसेस बंद पडल्यास कंत्राटदाराला 5 हजार रूपयांचा दंड असे अनेक निर्णय त्यांनी घेतले होते.

कर्मचाऱ्यांचा ओव्हरटाईम बंद, भाडेतत्वारील बसेस बंद पडल्यास कंत्राटदाराला 5 हजार रूपयांचा दंड असे अनेक निर्णय त्यांनी घेतले होते.

  07 फेब्रुवारी : कर्तव्यकठोर प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली झालीये. तुकाराम मुंढे यांची पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून हटवून त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलीये. नाशिक महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांची एमआयडीसीत बदली करण्यात आलीये.

  प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे जिथे जातात तिथे आपल्या कामाचा धडाका लावतात. नवी मुंबईनंतर  पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदावर तुकाराम मुंढेंची नियुक्ती करण्यात आली होती. नियुक्ती झाल्यानंतर तुकाराम मुंढेंनी इथंही आपल्या कामाचा धडाका लावला.  कर्मचाऱ्यांचा ओव्हरटाईम बंद, भाडेतत्वारील बसेस बंद पडल्यास कंत्राटदाराला 5 हजार रूपयांचा दंड असे अनेक निर्णय त्यांनी घेतले होते. अलीकडे मागील महिन्यात सलग गैरहजर राहाणाऱ्या 158 कंत्राटी कामगारांना तुकाराम मुंढेंनी  कामवरून बडतर्फ केलं होतं. हे 158 कामगार सलग 150 दिवस कामावर आले नाहीत म्हणून त्यांच्यावर ही मोठी कारवाई करण्यात आली होती.

  तुकाराम मुंढेंच्या या निर्णयानंतर सत्ताधारी भाजपचेच पदाधिकारी आक्रमक झाले होते. तुकाराम मुंढेंना हटवा, यासाठी भाजपचे स्थानिक पदाधिकारी फक्त मुख्यमंत्र्यांना पत्र लिहूनच थांबले नाहीतर तर पीएमपीएमएलला दिली जाणारी 268 कोटींची रक्कम न देण्याचा ठराव पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीनं मंजूर केला होता.

  पाहुयात तुकाराम मुंढेंनी कोण निर्णय घेतलेत ?

  जेष्ठ नागरिकांच्या मासिक पासच्या किंमतीत वाढ करण्यात आली.

  तसंच राजकीय पक्षांशी संबंधित कर्मचारी संघटनांची कार्यालयं रिकामी करण्याचे आदेशही मुंढेंनी दिलेत.

  पीएमपीएमलच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस नाकारण्यात आला.

  भरती प्रक्रियेतल्या त्रुटींमुळे १५८ कर्मचाऱ्यांना रुजू करून घेतलं नाही.

  तसंच वारंवार दांडी मारणाऱ्या 158 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलंय.

  सोलापूर आणि नवी मुंबई आता नाशिक !

  सोलापुर महापालिकेतली कारकीर्द वादळी ठरल्यानंतर तुकाराम मुंढेंकडे नवी मुंबई महापालिकेची सूत्र सोपवण्यात आली. तिथं देखील तुकाराम मुंढेंना सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध केला. त्याचीच पुनरावृत्ती पुणे आणि पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांकडून केली गेली. अखेर सत्ताधारी इथंही जिंकले आणि तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली झाली.

  First published:
  top videos

   Tags: PMPML, PMPML bus, Tukaram mundhe