मुंढेंच्या बदलीनंतर महापौर बंगल्याबाहेर फोडले फटाके, नाशिकरांची पोलिसांत तक्रार

मुंढेंच्या बदलीनंतर महापौर बंगल्याबाहेर फोडले फटाके, नाशिकरांची पोलिसांत तक्रार

महापौर रंजना भानसी यांच्या निवासस्थानाबाहेर जल्लोष करण्यात आला होता. यावेळी महापौरांच्या बंगल्यासमोर फटाके फोडण्यात आले होते.

  • Share this:

प्रशांत बाग, प्रतिनिधी

नाशिक, 23 नोव्हेंबर : नाशिक महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली. त्यांच्या बदलीच्या निर्णयामुळे महापौर बंगल्याबाहेर फटाके फोडण्यात आले होते. या प्रकरणी  महापौर रंजना भानसी यांच्याविरोधात मुंढे समर्थकांनी पोलिसात धाव घेतली आहे.

तुकाराम मुंढे यांनी नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदावरुन गुरुवारी बदली करण्यात आली. त्यांची नियुक्ती आता मंत्रालयात सहसचिव पदावर करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीनंतर लोकप्रतिनिधींनी एकच जल्लोष केला होता. खुद्द महापौर रंजना भानसी यांच्या निवासस्थानाबाहेर जल्लोष करण्यात आला होता. यावेळी महापौरांच्या बंगल्यासमोर फटाके फोडण्यात आले होते.

आता या प्रकरणी तुकाराम मुंढे यांच्या समर्थकांनी आक्षेप घेत पोलीस स्टेशन गाठले आहे.  सरकारवाड़ा पोलीस ठाण्यात मुंढे समर्थकांकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.

फटाके उडवत न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा दावा समर्थकांनी केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, तुकाराम मुंढे यांची नियुक्ती आता मंत्रालयात नियोजन विभागात करण्यात आली आहे. नियोजन विभागात तुकाराम मुंढे आता सहसचिव म्हणून काम करणार आहे. सह सचिव हे पद रिक्त होते. त्यापदावर मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली.

==============

First published: November 23, 2018, 1:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading