धक्कादायक! नागपुरात क्वारन्टाइन सेंटरमधील जेवणात निघाल्या अळ्या? तुकाराम मुंढे म्हणाले...

धक्कादायक! नागपुरात क्वारन्टाइन सेंटरमधील जेवणात निघाल्या अळ्या? तुकाराम मुंढे म्हणाले...

कधी जेवणात अळ्या, जेवण वेळेवर न मिळणे तर कधी अस्वच्छतेवरून क्वारन्टाइन सेंटरबाबत तक्रारी येत आहेत.

  • Share this:

नागपूर, 27 मे : नागपुरातील क्वारन्टाइन सेंटर दररोज कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत येत आहे. कधी जेवणात अळ्या, जेवण वेळेवर न मिळणे तर कधी अस्वच्छतेवरून क्वारन्टाइन सेंटरबाबत तक्रारी येत आहेत. VNIT येथील क्वारन्टाइन सेंटरमध्ये सकाळच्या जेवणात पोळ्या कडक आणि काळ्या आल्यानं अनेकांनी जेवण केलंच नाही. तर रात्रीच्या जेवणातील वरणात अळ्या निघाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हा प्रकार समोर आल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला. या क्वारन्टाइन सेंटरमध्ये लहान मुलं, जेष्ठ नागरिक आणि काही बाळंतीण महिलाही आहेत. त्यांना सकस आहाराची गरज आहे. मात्र, अशा निकृष्ट जेवणामुळं त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. तर दुसरीकडे जरीपटका येथील क्वारन्टाइन सेंटरमध्ये पिण्याचं पाणी संपल्यानं तिथे ठेवण्यात आलेल्या नागरिकांनी गोंधळ घातला.

पोलिसांनी संतापलेल्या नागरिकांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या गोंधळात फिजिकल डिस्टस्टिंगचा फज्जा उडाला. त्यामुळं कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

धक्कादायक प्रकाराबद्दल काय म्हणाले तुकाराम मुंढे?

क्वारन्टाइन सेंटरमधील धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, ही माहिती चुकीची आहे. पहिले जे वेंडर होते त्या ऐवजी सर्व क्वारंटाइन सेंटरच्या नागरिकांना राधास्वामी सत्संग यांच्या मार्फत आहार देत आहोत. यांचा जो आहार आहे तो निश्चित चांगला आहे. हे सगळ्यांच मान्य आहे, प्रत्येकाच्या अपेक्षा आम्ही पूर्ण करू शकत नाही, नागरिकांनी थोडं समजून घेऊन याला सहकार्य करण्याची गरज असल्याचंही मनपा आयुक्त म्हणाले.

संपादन - अक्षय शितोळे

कोरोना लॉकाऊननंतर आयुष्यात काय बदल होईल असं वाटतं? या प्रश्नांची द्या उत्तरं