पर्यटक कर मागितल्यामुळे शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांची मारहाण

पर्यटक कर मागितल्यामुळे शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांची मारहाण

आमदार तुकाराम काते हे महाबळेश्वरमध्ये फिरण्यासाठी आले होते. त्यांची गाडी वेण्णा लेक येथील चौकात अडवली.

  • Share this:

28 मे : शिवसेनेच्या आमदाराच्या गुंडगिरीची घटना साताऱ्यात घडलीय. महाबळेश्वरमध्ये पर्यटक कर मागितल्याच्या कारणावरून शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांनी वनसमितीच्या कार्यकर्त्यांना मारहाण केलीय.

आमदार तुकाराम काते हे महाबळेश्वरमध्ये फिरण्यासाठी आले होते. त्यांची गाडी वेण्णा लेक येथील चौकात अडवली. ते आमदार आहेत हे वनसमितीच्या कार्यकर्त्यांना माहीत नव्हते. त्यामुळे वनसमितीच्या कार्यकर्त्यांनी इतरांप्रमाणे आमदार काते यांच्याकडेही पर्यटन कर मागितला.पर्यटन कर मागितल्याच्या कारणावरून आमदार काते यांनी गाडीतून उतरून त्या तरूणास मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मोठी बाचाबाचीही झाली.

धक्कादायक म्हणजे महाबळेश्वर पोलिस ठाण्यात आमदाराविरोधातील वनसमितीच्या कार्यकर्त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही. त्याउलट, वनसमितीच्या कार्यकर्त्यांवरच गुन्हा दाखल करण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 28, 2017 02:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading