#TuesdayMorning: वाचा दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाच्या 11 बातम्या थोडक्यात!

आज मुंबईत पुढच्या 24 तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे तर दुसरीकडे आज सर्व देशाचं लक्ष वर्ल्ड कप सेमी फायनलचा सामन्याकडे आहे. पाहा या आणि अन्य महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात...

News18 Lokmat | Updated On: Jul 9, 2019 07:41 AM IST

#TuesdayMorning: वाचा दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाच्या 11 बातम्या थोडक्यात!

- मुंबईत मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज

आज म्हणजेच मंगळवारी मुंबईवर अस्मानी संकट येण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांनी मुंबईकरासाठी हाय अलर्ट जारी केला आहे. 200 मिली पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. आज ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची तर मुंबईत अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे.

- गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं पोलिसांचं नागरिकांना आवाहन

मुंबई आणि उपनगरात येत्या 24 तासांत बरसणारा हा पाऊस जोरदार आहे. त्यामुळे अतिमुसळधार पावसामुळे पोलिसांनी मुंबईकरांना शक्य असेल तरच घराबाहेर पडा अशा सुचना केल्या आहेत.

- रिक्षा चालकांचा संप मागे

Loading...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिक्षा चालकांच्या सर्व प्रश्नांवर सहानुभूतिपूर्वक विचार करण्याचं आश्वास दिल्याने मंगळवारचा रिक्षा चालकांचा संप संघटनेनं मागे घेतलाय. ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृति समिती महाराष्ट्रचे अध्यक्ष शशांक राव यांनी ही घोषणा केली. मंगळवारी शशांक राव हे प्रतिनिधी मंडळासोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. या बैठीक तोडगा निघेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

- नितेश राणे यांना कोर्टात हजर करणार

मुंबई-गोवा हायवेवरील खड्ड्यांविरोधात कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी (4 जुलै)रोजी आक्रमक आंदोलन केलं. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मिळून हायवे अभियंता प्रकाश शेडेकर यांच्या अंगावर चिखलाचे पाणी ओतले. इतकंच नाही तर शेडेकर यांना शिवीगाळ करत खांबाला बांधून ठेवण्याचा प्रयत्नदेखील केला. याप्रकरणी नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

- वर्ल्ड कप सेमी फायनलचा सामना

वर्ल्डकपमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सेमी फायनलचा सामना होत आहे. गुणतक्यात भारत अव्वल स्थानी असून चौथ्या स्थानी असलेल्या न्यूझीलंडशी होणार आहे.

- कर्नाटकाचे कांग्रेसचे नाराज आमदर गोव्यात

कर्नाटकमधल्या  काँग्रेस-जेडीएसच्या कुमारस्वामी सरकारपुढे मोठं संकट उभं राहिलं आहे. 14 बंडखोर आमदारांना सामावून घेण्यासाठी मंत्र्यांनीही राजीनामा दिलेत. त्यामुळे मुख्यमंत्री कुमारस्वामींची पळापळ सुरू झाली आहे.

- रोहिंग्याना पुन्हा त्यांच्या देशात पाठवण्याबाबतच्या याचिकेवर सुनावणी

- अनिस इस्लाम हा सईद गिलानीचा नातू यास चौकशीसाठी एनआयए बोलवणार

- भारतीय किसान संघटनेचा किसान आयोग स्थापण्याच्या मागणीसाठी दिल्लीत मोर्चा

- भाजपच्या संसदीय दलाची सकाळी 9.30वाजता दिल्लीत बैठक

- कांग्रेस कार्यकारी समितीची बैठक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 9, 2019 07:22 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...